मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे ! : 'स्वाभिमानी' च्या पदाधिकाऱ्यांनी केली आरती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:42 PM2018-12-31T14:42:20+5:302018-12-31T14:43:05+5:30
स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार, ३१ डिसेंबर रोजी मालेगाव शहरात ‘सीए चषक’संदर्भात एका ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकाखाली आरती करून मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी येऊ दे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : एकिकडे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यावर बोलायला सरकार तयार नाही. मात्र, एखाद्या उत्सवाप्रमाणे ‘सीएम चषक’ महाराष्ट्रात साजर केला जात आहे, असा आरोप करीत स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार, ३१ डिसेंबर रोजी मालेगाव शहरात ‘सीए चषक’संदर्भात एका ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकाखाली आरती करून मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी येऊ दे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. दूध फेकून देऊन ‘सीएम चषका’चा निषेध नोंदविला. शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, स्प्रिंकलर ड्रीपचे पैसे नाही, मालाला हमीभाव नाही, जिल्हा दुष्काळग्रस्त नाही, लाखो रुपये दराची जमीन असून एकरी ५० हजार रुपये कर्ज वाटप नाही; मात्र चषकाचे उदघाटन करायला आमदार, खासदार हे थाटामाटात येतात, असा आरोप करीत शेतकºयांच्या मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष इंगोले यांनी दिला.
शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी मालेगाव बंद !
शेतकऱ्यांच्या विविध स्वरूपाच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवार, ३१ डिसेंबर रोजी पुकारलेल्या मालेगाव शहर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
शासनाने शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये कर्जवाटप तात्काळ करावे, कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात थेट जमा करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला दामदुप्पट भाव देण्यात यावा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी ३१ डिसेंबर रोजी मालेगाव शहर बंदची हाक दिली होती. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दुपारपर्यंत बहुतांश व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. मात्र दुपारी २ वाजेनंतर व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने उघडल्याने बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली.