अनुदान द्या, अन्यथा उपाेषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:22+5:302021-05-27T04:43:22+5:30
निवेदनानुसार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टर व बी.बी.एफ या बाबीसाठी अर्ज सादर केला. ...
निवेदनानुसार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टर व बी.बी.एफ या बाबीसाठी अर्ज सादर केला. आपणाकडून पूर्वसंमतीपत्र दिलेल्या तारखेच्या ४५ दिवसांच्या आत मी आवश्यक कागदपत्रे कृषी सहायक यांच्याकडे सुपुर्द केली असता, त्यांनी सर्व मोका पाहणी केली व मला १५ दिवसांत तुमचे अनुदान जमा होईल, असे सांगितले. आज ६ महिने होऊनही मला फक्त बी.बी.एफ यंत्राचे अनुदान प्राप्त झाले. मात्र, ट्रॅक्टरचे अनुदान प्राप्त झाले नाही. याबाबत कृषी विभाग कारंजा यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. मला अनुदान मिळते, म्हणून ट्रॅक्टर खरेदी केला. आता त्यामुळे मला मानसिक त्रास झाला आहे. अनुदान न मिळाल्यामुळे मी ट्रॅक्टरचे २७ मे रोजी तालुका कृषी कार्यालयात दहन करू, असा ईशारा लोहारा येथील उपसरपंच तथा शेतकरी गजानन बासोळे यांनी दिला आहे.
काेट.....
लाभार्थीने चलित बी.बी.एफ यंत्रासाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे, त्यांना अनुदान प्राप्त झाले. मात्र, त्यांनी ट्रॅक्टरसाठी अर्ज केला नाही.
संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी