विहिरीत पडलेल्या निलगायीच्या पिलाला दिले जीवनदान

By admin | Published: October 9, 2016 01:43 AM2016-10-09T01:43:09+5:302016-10-09T01:43:09+5:30

सर्वधर्म आपतकालीन पथकाचे कार्य; उंबर्डा येथील घटना.

Giving life to Nilgayi's palla lying in the well | विहिरीत पडलेल्या निलगायीच्या पिलाला दिले जीवनदान

विहिरीत पडलेल्या निलगायीच्या पिलाला दिले जीवनदान

Next

उंबर्डाबाजार(जि. वाशिम),दि. 0८- शेतात असलेल्या भुईंसपाट विहीरीत पडलेल्या निलगायीच्या पाडसाला तीन तासाच्या अथक परिश्रमाने सर्वधर्म आपातकालीन पथकाच्या उंबर्डाबाजार येथील युवकांनी विहीरी बाहेर काढुन जीवनदान दिल्याची घटना घडली.
ग्राम उंबर्डाबाजार येथील शेतकरी सागर चिरडे यांचे दुघोरा शेत शिवारात उंबर्डाबाजार ,दुघोरा रस्त्यालगत शेती असून विहीरीचे बांधकाम करण्यात आले नसल्याने विहीरीजवळ येईपर्यंंत विहीर दिसत नाही. अशातच ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास शेतातून जाणार्‍या निलगायीच्या कळपातील एक पाडस अचानक विहीरीत पडले.सदरची घटना सागर यांचे काका यांनी पाहिली व याची माहिती तातडीने उंबर्डाबाजार येथील काळेकर यांना देताच सदरची माहिती त्यांनी आपातकालीन पथकाचे उंबर्डाबाजार येथील गणेश हळदे व वनविभागाला दिली. क्षणाचाही विलंब न करता आपतकालीन पथकाचे गणेश हळदे, महेश दिघडे, रोहन देंडव तुषार चिरडे, काळेकर यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी निलगायीचे पाडस विहीरीच्या पाण्यात पोहून थकुन अखेरचे क्षण मोजत असल्याचे पाहून गणेश हळदे व रोहन देंडव यांनी विहीरीत उडी मारुन निलगायीचरूत्त पाडसाला आधार दिला. निलगायीच्या पाडसाला विहीरी बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी काहीच साहित्य उपलब्ध नसल्याने पथकातील युवकांनी रबरी पार्इृपचा वापर करुन निलगायीच्या पाडसाला विहीर बाहेर काढुन शेतात सोडून दिले. निलगायीच्या पाडसाला जीवनदान देणार्‍या आपातकालीन पथकातील कार्यकत्यांचे स्वागत होत असतांना वनविभागाच्या कारभाराबाबत मात्र अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Giving life to Nilgayi's palla lying in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.