काचा फुटल्या, खिडक्या तुटल्या; सांगा कसे राहावे कोविड सेंटरमध्ये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 11:12 AM2021-06-01T11:12:45+5:302021-06-01T11:12:54+5:30

Washim News : पावसाळ्यात खोलीमध्ये पाणी येण्याचा धोका असून, यामुळे कोरोना रुग्णांची तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

The glass shattered, the windows shattered; Tell me how to stay in Covid Center? | काचा फुटल्या, खिडक्या तुटल्या; सांगा कसे राहावे कोविड सेंटरमध्ये?

काचा फुटल्या, खिडक्या तुटल्या; सांगा कसे राहावे कोविड सेंटरमध्ये?

googlenewsNext

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम शहरातील कोविड केअर सेंटर असलेल्या इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या असून, काचाही फुटल्या आहेत. पावसाळ्यात खोलीमध्ये पाणी येण्याचा धोका असून, यामुळे कोरोना रुग्णांची तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी इमारतींची डागडुजी करणे गरजेचे झाले आहे.
पहिल्या लाटेत सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या जिल्ह्यातील निवासी शाळा व वसतिगृहाच्या इमारती कोविड केअर सेंटर म्हणून ताब्यात घेण्यात आल्या. पहिली लाट ओसरल्यानंतर आपसूकच कोविड केअर सेंटरचे दरवाजेही कुलूपबंद झाले. दरम्यान, दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने सवड (ता.रिसोड), सुरकंडी (ता.वाशिम), सिव्हिल लाईन वाशिम, मंगरूळपीर, कारंजा येथे कोविड केअर सेंटरचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. 
कोविड केअर सेंटरमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरची व्यवस्था नाही. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत अंधारातच रहावे लागते. सवड व सुरकंडी येथील कोविड केअर सेंटरच्या इमारती बऱ्यापैकी आहेत. मात्र, अन्य ठिकाणच्या इमारतींची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक ठरत आहे. वाशिम येथील सिव्हिल लाईनस्थित कोविड केअर सेंटरच्या इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या तर काचा फुटलेल्या अवस्थेत आहेत. 
त्यामुळे वादळवाऱ्यासह पाऊस आला तर थेट खोलीत पाणी शिरते. यामुळे रुग्णांची तारांबळ उडते. संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला जात असल्याने पावसाळ्यात इमारतींमध्ये पाणी शिरणार नाही, याची दक्षताही घेणे आवश्यक ठरत आहे.

आठ कोविड सेंटरमध्ये २०० रुग्ण
जिल्ह्यात आठ कोविड सेंटर असून, या सेंटरमध्ये २०० रुग्ण दाखल असून, पावसाळ्यात गैरसोय होऊ नये म्हणून इमारती सुसज्ज ठेवणे आवश्यक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोविड केअर सेंटरच्या इमारती आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामीण भागातील संस्थात्मक विलगीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या इमारतींची पाहणी करणे अपेक्षित आहे.

Web Title: The glass shattered, the windows shattered; Tell me how to stay in Covid Center?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.