रेल्वेने कोठेही जा; नो वेटिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:43+5:302021-03-26T04:41:43+5:30

वाशिममार्गे सध्या कोल्हापूर-नागपूर, हैद्राबाद-अजमेर, हैद्राबाद- जयपूर, तिरूपती-अमरावती, इंदाैर-यशवंतपूर, दिल्ली-नांदेड या आठवड्यातून एक ते दोन दिवस धावणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे सुरू ...

Go anywhere by train; No waiting! | रेल्वेने कोठेही जा; नो वेटिंग !

रेल्वेने कोठेही जा; नो वेटिंग !

Next

वाशिममार्गे सध्या कोल्हापूर-नागपूर, हैद्राबाद-अजमेर, हैद्राबाद- जयपूर, तिरूपती-अमरावती, इंदाैर-यशवंतपूर, दिल्ली-नांदेड या आठवड्यातून एक ते दोन दिवस धावणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे सुरू असून दैनंदिन काचीगुडा-नरखेड ही इंटरसिटी एक्सप्रेस धावत आहे. जागा आरक्षित न केल्यास रेल्वेने प्रवास करण्यावर लादलेले निर्बंध अद्याप कायम असून आरक्षित जागांवर प्रवास करण्यास प्रवाशांमधून विशेष उत्साह दिसत नसल्याचे दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार, सर्वच रेल्वेगाड्या ३० ते ४० टक्के प्रवाशांच्या भरोशावरच चालत आहेत. त्यामुळे दुरवरच्या प्रवासाकरिताही आगावू आरक्षण करण्याची गरज राहिलेली नाही. मार्च महिन्यात शालांत परीक्षा असतात. त्या आटोपल्यानंतर एप्रिलमध्ये परजिल्ह्यांमध्ये फिरायला जाणारे रेल्वेचे आरक्षण करून ठेवतात. तशी परिस्थिती सध्या मात्र नसल्याची माहिती प्राप्त झाली.

.....................

रोज दोन ते तीन रेल्वे

सध्या वाशिममार्गे आठवड्यातून एक किंवा दोन दिवस धावणाऱ्या मोजक्याच रेल्वेगाड्या सुरू आहेत. इंटरसिटी एक्सप्रेस दररोज धावत आहे. असे असले तरी प्रवाशांचा विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. पूर्णत: आरक्षित या धोरणानुसार रेल्वेगाड्या धावत असताना तिकीटदरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरविली आहे. माैजमस्ती म्हणून पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी रेल्वेचे आरक्षण करणाऱ्यांचे प्रमाणही मंदावले आहे.

................................

एप्रिलमध्येही ‘नो वेटिंग’

दरवर्षी साधारणत: मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शालांत परीक्षा संपलेल्या असतात. त्यानंतर परजिल्ह्यांमध्ये फिरण्याचा बेत आखला जातो. त्यासाठी रेल्वेच्या प्रवासाला नागरिकांची पहिली पसंती असते. त्यामुळे रेल्वेत अनेकांना ‘वेटिंग’वर राहावे लागते. यंदा मात्र एप्रिलमध्येही ‘नो वेटिंग’ असल्याची माहिती मिळाली.

...............

अर्ध्यापेक्षा अधिक आसने राहताहेत रिक्त

सध्या वाशिममार्गे धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक आसने रिक्त राहत असल्याची एकंदरित स्थिती आहे. इंटरसिटी एक्सप्रेसलाही प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पुर्वीप्रमाणे ‘वेटिंग’वर राहण्याची गरज भासत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

....................

कोट :

वाशिममार्गे धावणारी पॅसेंजर रेल्वे अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णत: आरक्षित या धोरणानुसार एक्सप्रेस रेल्वेगाड्या चालविल्या जात आहेत. दरवर्षी मार्च, एप्रिल या महिन्यांमध्ये रेल्वेत बसायला जागा नसते. यंदा मात्र ‘वेटिंग’चा प्रश्नच उरलेला नाही. ज्यादिवशी प्रवास करायचा, त्यादिवशी तिकीट काढले तरी पुरेशी जागा उपलब्ध आहे.

- एम.टी. उजवे

स्टेशन मास्तर

Web Title: Go anywhere by train; No waiting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.