वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ओलांडले!
By admin | Published: August 3, 2015 01:07 AM2015-08-03T01:07:26+5:302015-08-03T01:07:26+5:30
रिसोड तालुक्यात वर्षभरात नऊ हजार शौचालय बांधकामाचे ‘टार्गेट’.
निनाद देशमुख / रिसोड: उघड्यावरील शौचवारीला आळा बसविण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकाम मोहिम शासनाने हाती घेतली आहे. २0१४-१५ या वर्षात रिसोड पंचायत समितीने उद्दिष्टापेक्षा जास्त बांधकाम करून जिल्ह्यात अवल्ल स्थान मिळविले आहे. २0५५ चे उद्दिष्ट पार करून तालुक्यात तब्बल २७३१ शौचालय बांधकाम झाले आहे. असे असले तरी आजही तालु क्यात केवळ ४0 टक्के कुंटुंबाकडेच शौचालय आहे. गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शासनातर्फे स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलेले आहे. मध्यंतरी या अभियानाचे नाव बदलून निर्मल भारत अभियान असे ठेवले होते. गतवर्षी निर्मल भारत अभियान हे नाव बदलून आता ह्यस्वच्छ भारत मिशनह्ण असे नामकरण केले होते. या अभियानांतर्गत प्रत्येक पंचायत समितीला वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात येते. २0१४-१५ या वर्षात रिसोड पंचायत समितीला २0५५ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात पंचायत समितीने २७३१ शौचालय बांधकाम करून आघाडी घेतली आहे. स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकार्यांनी गावपा तळीवर जनजागृती केली. उद्दिष्ट पार केल्यानंतरही अनेकांनी शौचालय बांधकाम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अनुदानाचा प्रश्न समोर आल्याने अनेकांना शौचालय बांधकाम करता आले नाही. २0१५-१६ या वर्षासाठी रिसोड पंचायत समितीला ९१0४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी जून अखेरीस १३0६ शौचालयाचे बांधकाम झाले आहे. गत एका महिन्यापासून पाऊस नसल्याने शौचालय बांधकाम मोहिमेलादेखील फटका बसत आहे. कोरडा दुष्काळसदृश परिस्थिती आणि जलपातळी खालावल्याने बांधकाम करण्यास कुणी धजावत नसल्याचे बोलले जात आहे. येत्या चार वर्षात २२ हजार शौचालय बांधकामाचे 'टार्गेट' रिसोड पंचायत समितीला गाठावयाचे आहे.