बकरी इद साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:43+5:302021-07-22T04:25:43+5:30
एरवी नमाज पठण करण्याकरिता रिसोड शहरातील सर्व मुस्लीम बांधव हे मेहकर रोडवरील इदगाह मैदानावर एकत्रित येत असतात; मात्र यावर्षीसुद्धा ...
एरवी नमाज पठण करण्याकरिता रिसोड शहरातील सर्व मुस्लीम बांधव हे मेहकर रोडवरील इदगाह मैदानावर एकत्रित येत असतात; मात्र यावर्षीसुद्धा कोरोना संकट असल्याकारणाने सार्वजनिक स्थळी धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली असल्याने इदची नमाज घरोघरी पठण करण्यात आली. दरवर्षी रमजान इद व बकरीच्या निमित्ताने इदगाह मैदानावर छोटे व्यावसायिक आपली दुकाने थाटून विविध खेळणी व खाद्यपदार्थांची विक्री करत असतात; मात्र यावेळीसुद्धा त्यांचा व्यापार कोरोनाने हिरावून घेतला. घरोघरी नमाज पठण केल्यानंतर मुस्लीम बांधवांनी कोरोना संकट हे देश व जगावरून लवकरात लवकर दूर व्हावे व विश्व शांती यासाठी विशेष प्रार्थनासुद्धा केली. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता ठाणेदार एस. एम. जाधव यांच्या नेतृत्वात शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. पोलिसांकडून गल्लोगल्ली फिरून व मशिदी ठिकाणी पाहणी केली.