सोने, चांदीच्या दरात चढ-उतार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:17 AM2021-02-21T05:17:27+5:302021-02-21T05:17:27+5:30
कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, डॉलरचे घसरणारे मूल्य, शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदार हे सुरक्षित व खात्रीलायक ...
कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, डॉलरचे घसरणारे मूल्य, शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदार हे सुरक्षित व खात्रीलायक गुंतवणूक म्हणून सोने, चांदी खरेदीकडे वळले होते. त्यामुळे सोने, चांदीच्या दरात वाढ होत गेली. कोरोना काळात गुंतवणुकीचा चांगला आणि खात्रीलायक पर्याय म्हणून गुंतवणूकदार हे सोने, चांदीमध्ये गुंंतवणूक करीत असल्याने मध्यंतरी सराफा बाजारात चांगलीच तेजी आली होती.
अनलॉकच्या टप्प्यात बाजारपेठ पूर्ववत झाली असून, उलाढालही वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून अन्य क्षेत्रालाही प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. गत काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे.
कधी सोने, चांदीला झळाळी मिळते तर कधी दरात घसरण होते. गत आठ दिवसांतील बाजारभाव विचारात घेतले, तर सोने प्रतितोळा ७०० रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी प्रतिकिलो १,००० रुपयाने महागल्याचे दिसून येते. ११ फेब्रुवारी रोजी सोने प्रतितोळा ४८ हजार ३०० रुपये तर चांदी प्रतिकिलो ६९ हजार रुपये असे दर होते. २० फेब्रुवारी रोजी सोने प्रतितोळा ४६ हजार ७०० रुपये तर चांदी प्रतिकिलो ७० हजार रुपये असे दर होते.
००००
असे आहेत दर
सोने (प्रतितोळा)चांदी (प्रतिकिलो)
११ फेब्रुवारी रोजीचे दर सोने ४८,३००चांदी ६९,०००
१७ फेब्रुवारी रोजीचे दर सोने ४६,७००चांदी ७०,०००