शिरपूर पोलिस ठाण्याला लागून असलेल्या सोने-चांदीच्या दोन दुकानांमध्ये चोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 05:01 PM2017-12-18T17:01:24+5:302017-12-18T17:07:41+5:30

शिरपूरजैन (वाशिम): येथील पोलिस ठाण्यापासून केवळ ५० मीटर अंतरावर असलेल्या सोने-चांदीच्या दोन दुकानांचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी दागिण्यांसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

gold and silver stolen from shops near police station | शिरपूर पोलिस ठाण्याला लागून असलेल्या सोने-चांदीच्या दोन दुकानांमध्ये चोरी!

शिरपूर पोलिस ठाण्याला लागून असलेल्या सोने-चांदीच्या दोन दुकानांमध्ये चोरी!

Next
ठळक मुद्देअज्ञात चोरट्यांनी त्यातील प्रफुल्ल बोधने यांच्या दुकानाचे शटर फोडून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केले.श्याम दिक्षित यांच्या दुकानाचे शटर फोडूनही १५ हजार रुपये किंमतीचे बेन्टेक्स दागिने, ५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बेसर आणि १० हजार रुपये किंमतीचा इलेक्ट्रॉनिक काटा लंपास केला. या घटनेमुळे पोलिसांचा चोरट्यांवरील धाक मावळल्याचे सिद्ध होत असून या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.


शिरपूरजैन (वाशिम): येथील पोलिस ठाण्यापासून केवळ ५० मीटर अंतरावर असलेल्या सोने-चांदीच्या दोन दुकानांचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी दागिण्यांसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. १७ डिसेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेवरून चोरट्यांनी एकप्रकारे पोलिस प्रशासनालाच आव्हान दिले असून व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, शिरपूरजैन येथील पोलिस ठाण्यासमोरच ज्वेलर्सची दुकाने वसलेली आहेत. १७ डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यातील प्रफुल्ल बोधने यांच्या दुकानाचे शटर फोडून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. याच दुकानानजिक असलेल्या श्याम दिक्षित यांच्या दुकानाचे शटर फोडूनही १५ हजार रुपये किंमतीचे बेन्टेक्स दागिने, ५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बेसर आणि १० हजार रुपये किंमतीचा इलेक्ट्रॉनिक काटा लंपास केला. तथापि, पोलिस ठाण्यापासून अगदीच हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचा चोरट्यांवरील धाक मावळल्याचे सिद्ध होत असून या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: gold and silver stolen from shops near police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.