गुड मॉर्निंग पथकासोबत ‘लोटाबहाद्दरां’चा वाद!
By admin | Published: June 9, 2017 01:24 AM2017-06-09T01:24:16+5:302017-06-09T01:24:16+5:30
उघड्यावर शौचास जाताना लोटा बहाद्दरांना हटकले असता, काही जणांनी पथकासोबत वाद घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : येथील नगर पंचायतचे गुडमॉर्निंग पथकाने ८ जुनला सकाळी ७ वाजता दरम्यान उघड्यावर शौचास जाताना लोटा बहाद्दरांना हटकले असता, काही जणांनी पथकासोबत वाद घातला. एवढय़ावरच न थांबता पथकातील सदस्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावले. याप्रकरणी मानोरा पोलिस स्टेशनला शब्बीर खॉ सिकंदर खॉ व ज्ञानेश्वर भास्कर पवनकार यांच्याविरुध्द तक्रार केली असून, पोलिसांनी सदर प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उघड्यावर शौच करु नये म्हणून गुडमॉर्निंग पथकाची नेमणुक केली आहे. शौचालय बांधकाम करुन, त्याचा वापर करणार्या कुटूंबाला शासन प्रोत्साहनपर अनुदान सुध्दा देत आहे. तरी सुध्दा काही नागरीक शौचालय बांधकाम करुन अनुदान लाटतात. मात्र उघड्यावर शौच करतात. उघड्यावर शौच करु नये म्हणून ८ जुनला मानोरा नगर पंचायतचे गुडमॉर्निंग पथकातील अभियंता अमोल राठोड, कार्यालय अधिक्षक नागनाथ गायकवाड, कर्मचारी सुखदेव लवटे, जगदीश नागलोत, दिपक चिस्तळकर हे वडरपुरा मदिनानगर भागात गेले असता, त्यांना लोटा बहादर उघड्यावर शौच करीत असताना आढळले. हटकले असता ते पथका तील सदस्यांच्या अंगावर मारण्यास धावले. त्यामुळे फिर्यादी अभियंता अमोल राठोड यांनी मानोरा पोलिस स्टेशनला त्या लोटा बहाद्दराविरूद्ध तक्रार दाखल केली. सदर प्रकरण पोलिसांनी चौकशीत घेतले असून सदर लोटा बहादरावर कोणती कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.