आमदार-खासदारांचा सोशल मीडियावरच गोपाळकाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:26+5:302021-09-02T05:29:26+5:30

संतोष वानखडे वाशिम : सध्या श्रावण महिना सुरू असतानाही, कोरोनाचे कारण समोर करून शासनाने अद्याप मंदिरे उघडण्यास परवानगी दिली ...

Gopalkala on social media of MLAs and MPs! | आमदार-खासदारांचा सोशल मीडियावरच गोपाळकाला!

आमदार-खासदारांचा सोशल मीडियावरच गोपाळकाला!

Next

संतोष वानखडे

वाशिम : सध्या श्रावण महिना सुरू असतानाही, कोरोनाचे कारण समोर करून शासनाने अद्याप मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियाचा वापर होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात एक खासदार आणि विधानसभेचे तीन, विधानपरिषदेचे एक असे चार आमदार आहेत. खासदार व एका आमदाराचा अपवाद वगळता उर्वरित तीन आमदारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गोपाळकाला व श्रावण महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.

०००००

खासदारही सोशल मीडियावर!

खासदार भावना गवळी यांचे फेसबुक व ट्विटर अकाऊंट आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून त्यावर एकही पोस्ट अपलोड केल्याचे दिसून येत नाही. प्रत्यक्ष जनसंपर्कावर भर दिला आहे.

०००००

झनक ट्विटरवर

रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून श्रावण महिना, गोपाळकाला, श्रीकृष्ण जन्माष्टमी आदींच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते मतदारांच्या संपर्कात राहत असल्याचे दिसून येते.

०००००

पाटणी ट्विटरवर

कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून श्रावण महिना, गोपाळकाला आदींच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते मतदारांच्या संपर्कात राहत असल्याचे दिसून येते.

०००००

मलिक ट्विटरवर

वाशिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार लखन मलिक यांचे ट्विटर अकाऊंट आहे. परंतु, त्यावर एकही पोस्ट अपलोड नाही. शुभेच्छा संदेशही नाही. प्रत्यक्ष जनसंपर्कावर भर असल्याचे सांगितले जात आहे.

०००

सरनाईक फेसबुकवर

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक हे फेसबुकच्या माध्यमातून श्रावण महिना, रक्षा बंधन आदी सणांच्या शुभेच्छा देत मतदारांच्या संपर्कात राहत असल्याचे दिसून येते.

०००००००००००००

Web Title: Gopalkala on social media of MLAs and MPs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.