गोरसेनेचे उपोषण दुसऱ्याही दिवशी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:39+5:302021-01-22T04:36:39+5:30
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले असून ते शेतकरीविरोधात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विविध प्रांतांतील शेतकरी दिल्ली येथे ...
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले असून ते शेतकरीविरोधात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विविध प्रांतांतील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत; मात्र सरकारने अद्याप आंदोलनाची दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, गोरसेना या संघटनेने राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये २० जानेवारीपासून साखळी आंदोलनास सुरुवात केली आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी गोरसेनेचे पदाधिकारी राजाराम जाधव, अनिल राठोड, नीलेश राठोड, राजू जाधव, रामसिंग चव्हाण, गोपाल चव्हाण, आशिष राठोड, लखन राठोड, पंकज पवार, सरजीत चव्हाण, सुनील राठोड, वैभव जाधव, ज्ञानेश्वर राठोड, सुनील राठोड, दिलीप राठोड, गजानन राठोड, प्रकाश राठोड, गोकूळ आडे, बळीराम राठोड, सचिन चव्हाण, राजू राठोड, साईनाथ आडे, उल्हास राठोड, संतोष चव्हाण, कैलास पवार, श्यामराव चव्हाण, गणेश येवले, सुनील जाधव, जीवन राठोड, अॅड. संगीता राठोड, बालीबाई चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.