बँकेतील गर्दीवर मिळाले नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:42 AM2021-05-13T04:42:15+5:302021-05-13T04:42:15+5:30

काजळेश्वर उपाध्ये : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खातेदारांच्या बॅंक खात्यांच्या शेवटच्या क्रमांकानुसार दैनंदिन व्यवहार करण्याचे निर्देश दिले. ...

Got control over the bank crowd | बँकेतील गर्दीवर मिळाले नियंत्रण

बँकेतील गर्दीवर मिळाले नियंत्रण

Next

काजळेश्वर उपाध्ये : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खातेदारांच्या बॅंक खात्यांच्या शेवटच्या क्रमांकानुसार दैनंदिन व्यवहार करण्याचे निर्देश दिले. त्याची अंमलबजावणी केली जात असल्याने, बॅंकेतील गर्दीवर नियंत्रण मिळाल्याचे दिसून येत आहे.

..................

लस घेऊन सुरक्षित होण्याचे आवाहन

रिसोड : तालुक्यात सध्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यानुसार, प्रत्येकाने लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन डॉक्टर असोसिएशनचे रिसोड तालुकाध्यक्ष डॉ.अजय पाटील यांनी केले.

......................

ग्रा.पं.कडून माहिती देण्यास टाळाटाळ

मालेगाव : कुरळा धरणावरून शहरात केल्या जात असलेल्या पाणीपुरवठ्याचे पाणी पिण्याचे की वापराचे, याबाबतची माहिती मालेगाव नगरपंचायतला मागितली. मात्र, ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ता सुनील शर्मा यांनी केली.

..........................

डिझेलचे दर कमी करण्याची मागणी

वाशिम : आगामी खरीप हंगामातील पेरणीकरिता शेती सज्ज ठेवावी लागत आहे. त्यानुषंगाने ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे केली जात आहेत. मात्र, डिझेलचे दर वाढल्याने शेतकरी संकटात सापडले असून, दर कमी करण्याची मागणी होत आहे.

.............

गावठाण सर्वेक्षण कामास ‘ब्रेक’

वाशिम : गावठाण सर्वेक्षणाचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करा. त्यासाठी तालुकास्तरीय समिती सदस्यांनी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन करण्यात आले. मात्र, कोरोना संकटामुळे त्यास ‘ब्रेक’ लागला आहे.

...............

वाशिम तालुक्यात १०२ जण पॉझिटिव्ह

वाशिम : बुधवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम तालुक्यात विविध ठिकाणचे १०२ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. धोका वाढत असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

.................

पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. यामुळे विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे. याकडे लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

..................

अतिक्रमण प्रस्ताव नियमानुकूल करा

वाशिम : निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करून पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष जगदीश इंगळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

..................

नाली स्वच्छतेकडे पालिकेचे लक्ष

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नगर पालिकेने नाल्यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविणे सुरू केले आहे. त्यानुषंगाने बुधवारी आरोग्य पथकाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली.

......................

नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

वाशिम : कोरोनाविषयक नियम तोडणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुषंगाने विनाकारक फिरणाऱ्यांवर कारवाई करत, दंड वसूल करण्यात येत असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेकडून मिळाली.

...........

रस्त्यांची कामे मार्गी लागणार

वाशिम : शहर विकासासाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून विशेषत: मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेल्या विविध ठिकाणच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे नागरिकांची सोय होणार आहे.

........

‘एबी’ केबलमुळे चोरीस आळा

वाशिम : ‘एअर बंच’मुळे (एबी केबल) वीजचोरीस बहुतांशी आळा बसला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारचे केबल टाकण्यात आल्याने, महावितरणचा फायदा होत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.

................

भंगार वाहनांच्या लिलावाची मागणी

वाशिम : स्थानिक शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात जप्तीची अनेक वाहने जागीच भंगार झाली आहेत. या वाहनांचा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी शहरातील सूज्ञ नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Got control over the bank crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.