मंगळवारपासून शासकीय कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 03:46 PM2018-08-05T15:46:51+5:302018-08-05T15:47:58+5:30
वाशिम : शासनदरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी ७ आॅगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनदरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी ७ आॅगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तसेच महसूल कर्मचारी महासंघाने यासंदर्भात शनिवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत तीन दिवशीय संपासंदर्भात पूर्वसूचना दिली.
मागील दोन वर्षांपासून कर्मचाºयांच्या मागण्यांसदर्भात ठोस निर्णय घेण्यात आला नाही, असा आरोप करीत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ७, ८ व ९ आॅगस्ट २०१८ रोजी तीन दिवस राज्यव्यापी संपाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला. सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेंशन योजना रद्द करावी, पाच दिवसाचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे आदी मागण्या शासनस्तरावर वेळोवेळी करण्यात आल्या. मात्र, याकडे शासनाने अद्याप लक्ष दिले नसल्याने ७ ते ९ आॅगस्ट दरम्यान शासकीय, निमशासकीय कर्मचारी तीन दिवशीय संपावर जात आहेत. या संपात सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना यासह विविध संघटना सहभागी होणार असल्याचा दावा कर्मचारी महासंघाने केला. जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संघटनेने शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देत ७ ते ९ आॅगस्ट दरम्यान संपावर जात असल्याची पूर्वसूचना दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष विजय धुमाळे, सचिव एच.जे. परिहार, महासंघाचे उपाध्यक्ष संतोष शिकार, स्वाती वानखेडे, सुरेश वानखेडे, शाखा अभियंता दुरतकर, नाना तुर्के, अमोल कापसे, सुभाष काळे, डी. डी. राठोड, भागवत महाले, रामानंद ढंगारे, अनिल उल्हामाले, कांतप्रसाद तिवारी, संदीप चव्हाण, अविनाश पाठक, देवानंद धंतुरे, प्रवीण आरू, सचिन गटलेवार, राजू राऊत, सुनील मारुतकर, वाघमारे, शेलकर, एस.जे. गावंडे, दत्ता गायकवाड, इतर सर्व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थिती होती.