सरकारने देशात अदृष्य आणीबाणी लावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 07:20 PM2017-09-18T19:20:34+5:302017-09-18T19:20:52+5:30
विद्यमान शासनाने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पूर्णत: फसवी असून विकासाच्या नावावर शेतकºयांची अक्षरश: लूट केली जात आहे. फोडा आणि राज्य करा, अशी निती अवलंबिलेल्या भाजपा सरकारने देशात एकप्रकारे अदृष्य आणीबाणीच लावली आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: विद्यमान शासनाने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पूर्णत: फसवी असून विकासाच्या नावावर शेतकºयांची अक्षरश: लूट केली जात आहे. फोडा आणि राज्य करा, अशी निती अवलंबिलेल्या भाजपा सरकारने देशात एकप्रकारे अदृष्य आणीबाणीच लावली आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले.
सरकारमधून बाहेर पडल्यानंतर प्रथमच काढलेल्या राज्यव्यापी दौºयादरम्यान मालेगाव येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत तुपकर यांनी सरकारवर कडाडून टिका केली. यावेळी तुपकर यांचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष दामूअन्ना पाटील, मराठवाड्याचे गजानन पाटील बंगाळ, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अमोल वाघमारे, टाले आदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलताना तुपकर म्हणाले, की विद्यमान सरकारच्या स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाले; पण विकासकामांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यामुळेच आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. सरकारने नोटाबंदीनंतर किती नुकसान झाले, किती नोटा नव्याने छापल्या, याचा हिशेब अद्याप जनतेसमोर सादर केलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची योजना फसवी असून त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकºयांना अद्याप मिळाला नाही. विकासाच्या नावाखाली शेतकºयांची लूट केली जात आहे. याविरोधात कुणी बंड पुकारले तर त्याला वेगवेगळ्या प्रकारची भिती दाखविली जात आहे. परंतू आम्ही सरकारला कदापि भिणार नाही, असे तुपकर म्हणाले. शेतकºयांच्या शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक भाव मिळाला पाहिजे, हमी भाव केंद्र ठिकठिकाणी सुरू व्हायला हवे, यासह इतर मागण्यांसाठी नोव्हेंबरच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी जंतरमंतरवर धडक मोर्चा काढला जाणार असून देशभरातील शेतकरी त्यात सहभागी होतील, असा दावा यावेळी तुपकर यांनी केला.