दुधाच्या शासकीय दरात केवळ एक रुपयाने वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 05:17 PM2020-10-13T17:17:55+5:302020-10-13T17:18:03+5:30

दुधाच्या शासकीय दरात केवळ एका रुपयाने वाढ केल्याने दुध उत्पादक शेतकरी संतप्त झाले.

Government increase in milk price by only one rupee! | दुधाच्या शासकीय दरात केवळ एक रुपयाने वाढ !

दुधाच्या शासकीय दरात केवळ एक रुपयाने वाढ !

googlenewsNext

वाशिम : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धोत्पादन करण्याचा सल्ला कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे दिला जातो. परंतू, दुधाच्या शासकीय दरात अपेक्षेप्रमाणे वाढ होत नसल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. १२ आॅक्टोबर रोजी दुधाच्या शासकीय दरात केवळ एका रुपयाने वाढ केल्याने दुध उत्पादक शेतकरी संतप्त झाले.
शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सोबतच जोडधंदा म्हणून दुग्धोत्पादनाकडे वळावे असाही सल्ला देण्यात येतो. वाशिमसह विदर्भात बºयापैकी दुग्धोत्पादन होते. अनेक पशुपालक हे खासगी पद्धतीने गाव, शहर परिसरात दुध विक्री करतात तर काही शेतकरी हे शासकीय दुध संकलन केंद्राकडे दुधाची विक्री करतात. दुधाच्या दरात वाढ, वितरक कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे. १२ आॅक्टोबर रोजी आरे शक्ती गाय दूध, फुल क्रीम दूध या प्रकारातील दुध विक्रीत प्रती लिटरने एका रुपयाची वाढ करण्यात आली. आरे शक्ती गाय दूधाचे पूर्वीचे दर हे प्रती लिटर ४१ रुपये होते. आता या दरात एक रुपयाने वाढ करीत ४२ रुपये दर करण्यात आले. फुल क्रिम दूध हे ४६ रुपयावरून ४७ रुपये प्रती लिटर असे दर करण्यात आले. अन्य प्रकारच्या शासकीय दूधाच्या प्रती लिटर किंमतीतही किमान ४ ते ५ रुपयाने वाढ करण्याची मागणी दुध उत्पादक शेतकºयांमधून होत आहे.

 
दुध उत्पादक शेतकºयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. महागाईच्या काळात दुधाच्या शासकीय दरात किमान ४ ते ५ रुपयाने वाढ करावी, अशी अपेक्षा आहे.
- दिलीप पंडीतराव सरनाईक
शेतकरी, शेलगाव बगाडे ता. मालेगाव ज्.िवाशिम

Web Title: Government increase in milk price by only one rupee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.