शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:19 PM2020-11-21T17:19:04+5:302020-11-21T17:19:11+5:30

Washim News दिवाळी संपल्यानंतरही अधिकारी, कर्मचारी वेळेवर हजर राहत नसताना संबधितांचे मात्र याकडे दुर्लक्ष दिसत आहे.

Government officers and employees Not in office even after Diwali over | शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी संपेना

शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी संपेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  दिवाळी झाली असली तरी अनेक शासकीय कार्यालयामधील अनेक कक्ष अधिकारी, कर्मचारी वेळ हाेऊनही उपस्थित नसल्याचे लाेकमतने २० नाेव्हेंबर राेजी विविध शासकीय कार्यालयातील पाहणीवरुन दिसून आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यास साहेब आले नाही का विचारणा केली असता त्याने मात्र चुप्पी साधली हाेती.
वाशिम शहरातील आरटीओ ऑफीस, पंचायत समिती, तहसील कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय, भूजल सर्वेक्षण कार्यालयाची २० नाेव्हेंबर राेजी सकाळी १०.३० ते ११ वाजेदरम्यान पाहणी केली असता अनेक कर्मचारी कर्तव्यावर आलेच नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात कायार्लयात हजर असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास विचारणा केली असता साहेब आले नसल्याचे सांगण्यात आले. दिवाळी संपल्यानंतरही अधिकारी, कर्मचारी वेळेवर हजर राहत नसताना संबधितांचे मात्र याकडे दुर्लक्ष दिसत आहे.

कार्यालयात शुकशुकाट
वाशिम शहरातील आरटीओ (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय) येथे २० नाेव्हेंबर राेजी १० वाजून ५४ मिनिटापर्यंत अनेक अधिकारी कर्मचारी हजर झाले नव्हते. येथे हजर असलेल्या एका कर्मचाऱ्यास विचारणा केली असता त्याने काहीही न सांगता निघून गेला. या कार्यालयातील अनेक कर्मचारी हे बाहेरगावाहून येत असल्याने अनेकदा वेळेवर पाेहचत नसल्याचे चित्र आहे.


११ वाजेपर्यंत कर्मचारी नाही
वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अनेक कर्मचारी ११ वाजेपर्यंत कार्यालयात पाेहचले नसल्याचे दिसून आले. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने कार्यालय उघडून माेबाईलमध्ये मश्गुल असल्याचे दिसून आले. कार्यालयात दाेन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त काेणीही दिसून आले नाही. काही जण येऊन परत गेल्याचे समजले.


कार्यालय उघडे, आत काेणी नाही
वाशिम येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रा कार्यालयात ११ वाजून ०३ मिनिटापर्यंत कर्मचारी आलेले दिसून आले नाहीत.  केवळ एक कर्मचारी आतमध्ये हाेते. या कार्यालयात नागरिकांचे कामे पडत नसल्याने येथे गर्दी राहत नाही याचा फायदा घेत कर्मचारी वेळेवर हजर हाेत नसल्याची पुढे आले. अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नसताना याकडे मात्र कुणाचे लक्ष नाही.

Web Title: Government officers and employees Not in office even after Diwali over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.