शासकीय कार्यालयांना स्वतंत्र इमारतींची प्रतीक्षा !
By admin | Published: April 26, 2017 02:11 PM2017-04-26T14:11:57+5:302017-04-26T14:11:57+5:30
जिल्ह्यातील जवळपास ३६ शासकीय-निमशासकीय कार्यालयांना स्वतंत्र इमारत नाही.
वाशिम - जिल्ह्यातील जवळपास ३६ शासकीय-निमशासकीय कार्यालयांना स्वतंत्र इमारत नाही. या कार्यालयांना स्वतंत्र इमारतीसाठी जागा व निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्यापही या प्रस्तावाला मंजुरात मिळाली नाही.
प्रत्येक शासकीय-निमशासकीय कार्यालयाचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी स्वतंत्र इमारतीची तरतूद केली जाते. वाशिम येथील ३६ कार्यालयांचा अपवाद वगळता उर्वरीत कार्यालयांना स्वतंत्र इमारत आहे. मात्र, ३६ कार्यालयांना स्वतंत्र इमारत असावी, याबाबतचा प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे या कार्यालयांचे कामकाज भाडेतत्त्वार घेतलेल्या इमारतींमधून चालत आहे. ३६ कार्यालयांमध्ये काही जिल्हास्तरीय व काही तालुकास्तरीय कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय एक शासकीय गोदाम, पाच वसतीगृहेसुद्धा भाड्याच्याच इमारतीत चालविण्यात येत आहेत.