शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग झाला मोकळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 07:04 PM2020-07-08T19:04:26+5:302020-07-08T19:04:38+5:30
७ जुलैच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाने हा मार्ग मोकळा झाला आहे.
वाशिम : कोविड-१९ संसर्गजन्य रोगाच्या प्रादूर्भावामुळे २०२०-२१ या वित्तिय वर्षात राज्याच्या महसुलीत झालेली घट व अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम लक्षात घेता राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या थांबल्या होत्या. परंतु ७ जुलैच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाने हा मार्ग मोकळा झाला आहे. ३१ जुलैपर्यंत अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्टÑ शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाºया विलंबास अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या प्रत्यक वर्षी एप्रिल व मे या महिन्यात करण्यात येतात. परंतु या बदल्या कोरोनाच्या पृष्ठभूमिवर रखडल्या होत्या. परंतु सामान्य प्रशासनाने काढलेल्या आदेशान्वये चालु वित्तीय वर्षात ३१ मे २०२० पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या ३१ जुलै २०२० पर्यंत एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के एवढया मर्यादेत सक्षम प्राधिकºयाच्या मान्यतेने कराव्यात. तसेच सर्वसाधारण बदल्यांव्यतिरिक्त काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणामुळे बदल्या करावयाच्या असल्यास अशा बदल्या देखिल ३१ जुलैपर्यंत नियमानुसार करण्याच्या सूचना संबधितांना सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांनी दिल्या आहेत.