दिव्यांगातर्फे गितातून शासकीय योजनांची माहिती
By admin | Published: March 19, 2017 01:32 PM2017-03-19T13:32:46+5:302017-03-20T03:01:15+5:30
वाशिम येथील काही अंध चिमुकले एकत्र येवून त्यांनी आर्केष्टा तयार केला. यामधून ते अनेक विभागातील शासकीय योजनांची माहिती विविध कार्यक्रमांमध्ये जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वाशिम : जीवनात सर्वत्र काळोख असतांना वाशिम येथील काही अंध चिमुकले एकत्र येवून त्यांनी आर्केष्टा तयार केला. यामधून ते अनेक विभागातील शासकीय योजनांची माहिती विविध कार्यक्रमांमध्ये जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याया कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर यांचे चिरंजिव चेतन हा लहानपणापासूनचं अंध आहे. अंध असतांनाही त्याच्यामधील जिद्द व चिकाटी वाखाण्याजोगी आहे. त्याने शेतकरी आत्महत्याबाबत व विविध शासकीय योजनांचा सर्वसामान्यांना लाभ व्हावा याकरीता विविध शासकीय कार्यालय, सामाजिक संघटना राबवित असलेल्या कार्यक्रमामध्ये चेतन उचितकर सह त्यांची सातही अंध असलेली चमूंना पाचारण करताहेत. तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये श्रोत्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून मधामधात मराठी, हिंदी चित्रपटातील गितेही ते सुरेल आवाजात गात आहेत.