तहसील कार्यालयात मका फेकून शासनाचा निषेध...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:22+5:302021-04-02T04:43:22+5:30
स्वस्त धान्य दुकानातून दिला जाणारा मका हा निकृष्ट असून, हा मका जनावरेही खात नाहीत. त्यामुळे माणसांनी तो कसा ...
स्वस्त धान्य दुकानातून दिला जाणारा मका हा निकृष्ट असून, हा मका जनावरेही खात नाहीत. त्यामुळे माणसांनी तो कसा खावा? हा विचार शासनाने करावा, असा प्रश्न युवक मंडळाने तहसीलदारांना १ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनातून नमूद केला आहे. गावातील जनसामान्य लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा हा मका आम्हाला नको आहे, या ऐवजी आम्हाला आवश्यक असलेले इतर धान्य वाढवून देण्यात यावे, अशी मागणीही या युवक मंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महानायक वसंतराव नाईक युवक मंडळाने तहसील कार्यालयाच्या मुख्य दरवाजापासून तहसीलदारांच्या खुर्चीपर्यंत मका फेकून ‘निकृष्ट व निरुपयोगी धान्य देणाऱ्या शासनाचा निषेध असो’ अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. निवेदनावर बी. एल. राठोड, जानकीराम राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.