सामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची शासनाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:54+5:302021-07-26T04:37:54+5:30

शर्मा यांच्या निवेदनाची राज्यशासनाने घेतली दखल : योग्य कार्यवाहीचे जिल्हाधिकारी यांना दिले आदेश शर्मा यांच्या निवेदनाची राज्यशासनाने घेतली दखल ...

Government responds to social worker's demand | सामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची शासनाकडून दखल

सामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची शासनाकडून दखल

Next

शर्मा यांच्या निवेदनाची राज्यशासनाने घेतली दखल

: योग्य कार्यवाहीचे जिल्हाधिकारी यांना दिले आदेश

शर्मा यांच्या निवेदनाची राज्यशासनाने घेतली दखल

: योग्य कार्यवाहीचे जिल्हाधिकारी यांना दिले आदेश

मालेगाव : शहरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ता सुनील शर्मा यांच्या आत्मदहनच्या पत्राची दखल राज्य शासनाने घेतली असून, योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी वाशिम यांना दिले आहे.

मालेगाव शहरात मागील अनेक वर्षांपासून नळ योजनेद्वारा गढूळ व अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे, तर दुसरीकडे नगरपंचायततर्फे पाणीपट्टी करात मोठी वाढ करण्यात येऊन ३६० रुपयांवरून १२०० रुपये कर घेतल्या जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करावा अन्यथा पाणीपट्टी कर कमी करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सुनील शर्मा यांनी केली व त्याबाबत नगरपंचायतला वारंवार पत्र दिले, परंतु योग्य ती कारवाई न झाल्याने येत्या ९ ऑगस्ट रोजी मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा संबंधितांना पत्रातून दिला या पत्राची दखल महाराष्ट्र राज्य विशेष कार्यकारी अधिकारी राज्यमंत्री गृहग्रामीण यांच्या वतीने घेण्यात आली आहे .

Web Title: Government responds to social worker's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.