आदिवासी बांधवांना शासनाने खावटी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:51+5:302021-06-23T04:26:51+5:30
आदिवासी यमाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाकडून अर्थसाहाय्य खावटी म्हणून मिळते. काजळेश्वर येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी बांधवांचे ११३ प्रस्ताव आदिवासी ...
आदिवासी यमाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाकडून अर्थसाहाय्य खावटी म्हणून मिळते. काजळेश्वर येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी बांधवांचे ११३ प्रस्ताव आदिवासी प्रकल्प अधिकारी अकोला यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत, ते तातडीने मंजूर व्हावेत, या मागणीसाठी कारंजा पं. स.चे सदस्य आदिवासी युवा नेते रंगराव धुर्वे
यांनी कारंजा उपविभागीय अधिकारी
यांची सोमवारी भेट घेऊन चर्चा केली तसेच आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्याशी संवाद साधला. गोरगरीब आर्थिक दुर्बल व्यक्ती काजळेश्वर येथे आदिवासी बहूल वस्तीत राहतात. कोरोना
लॉकडाऊन काळात अत्यंत वाईट
अवस्थेत त्यांनी दिवस काढले. आठ महिन्यांपूर्वी कागदपत्रे आदिवासी प्रकल्प अधिकारी अकोला यांच्याकडे सादर केली तेव्हा उपविभागीय अधिकारी कारंजा यांनी याप्रकरणी लक्ष घालावे व समाजबांधवांना खावटी त्वरित द्यावी, अशी मागणी रंगराव धुर्वे यांनी केली आहे .