शासकीय वाहनावरून ‘कही खुशी-कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:11 AM2017-12-22T02:11:49+5:302017-12-22T02:13:14+5:30

वाशिम : शासकीय वाहनावरून सभापतींमध्ये ‘कही खुशी-कही गम’चे वातावरण गुरुवारी जिल्हा परिषद प्रांगणात उपस्थितांना अनुभवयास मिळाले. सहा पंचायत समितीच्या सभापतींना नवीन वाहनांचे वाटप करण्यात आल्याने या सभापतींमध्ये आनंदाचे वातावरण होते, तर जिल्हा परिषदेच्या चारही विषय समितीच्या सभापतींची वाहने अधिवेशनाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्याने या सभापतींच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.

From the government vehicle, 'some joy-kahi gum' | शासकीय वाहनावरून ‘कही खुशी-कही गम’

शासकीय वाहनावरून ‘कही खुशी-कही गम’

Next
ठळक मुद्देपंचायत समितीच्या सभापतींना नवीन वाहनांचे वाटप जि.प. सभापतींची वाहने अधिवेशनात

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासकीय वाहनावरून सभापतींमध्ये ‘कही खुशी-कही गम’चे वातावरण गुरुवारी जिल्हा परिषद प्रांगणात उपस्थितांना अनुभवयास मिळाले. सहा पंचायत समितीच्या सभापतींना नवीन वाहनांचे वाटप करण्यात आल्याने या सभापतींमध्ये आनंदाचे वातावरण होते, तर जिल्हा परिषदेच्या चारही विषय समितीच्या सभापतींची वाहने अधिवेशनाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्याने या सभापतींच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.
रिसोड, वाशिम, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा व मालेगाव अशा सहा पंचायत समितीच्या सभापतींसाठी नवीन शासकीय वाहने खरेदी करण्याचा ठराव यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित झाला होता. त्यानुषंगाने प्रशासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर सहा शासकीय वाहने खरेदी करण्यात आली. सदर वाहने पंचायत समिती सभापतींच्या ताब्यात देण्यासाठी २१ डिसेंबर रोजी सर्व सभापतींना आमंत्रित केले होते. २१ डिसेंबर रोजी सहाही सभापतींना अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत वाहनांची चावी देण्यात आली. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या चारही विषय समितीच्या सभापतींची शासकीय वाहने जमा करून विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. हा प्रकार राज्यातून केवळ वाशिम जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांसोबत घडला असून, नेमक्या वाशिम जिल्हा परिषदेच्याच चारही सभापतींची वाहने अधिवेशनाकरिता का उपलब्ध करून देण्यात आली, याचा जाब या सभापतींनी जिल्हा परिषद प्रशासनाला विचारला. 
शासकीय वाहन उपलब्ध नसल्याने सध्या ग्रामीण भागात दौरे करणे प्रभावित झाल्याची बाब पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. वाहने भाड्याने घेऊन दौरे करावे लागत आहेत. अन्य कोणत्याही जिल्हा परिषदेच्या सभापतींची वाहने अधिवेशनाकरिता उपलब्ध करून दिली नसल्याने नेमकी वाशिम जिल्हा परिषदेच्याच सभापतींची वाहने जमा करून हा एकप्रकारे महिला सभापतींचा अपमान आहे, अशी भावनाही सभापती पानुताई दिलीप जाधव, यमुना सीताराम जाधव, सुधीर  गोळे व विश्‍वनाथ सानप यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली. सध्या शासकीय वाहने नसल्याने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी तसेच कोणत्या आधारावर शासकीय वाहने अधिवेशनाकरिता पाठविण्यात आली, याची माहिती देण्यात यावी, अन्यथा न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या चारही विषय समितीच्या सभापतींनी दिला.  दरम्यान, एकाच दिवशी शासकीय वाहनासंदर्भात ‘कही खुशी-कही गम’ची परिस्थिती निर्माण होण्याची अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी घटना आहे, अशी चर्चा आहे.
शासकीय वाहनाचे सदर प्रकरण नेमके कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: From the government vehicle, 'some joy-kahi gum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम