अधिकाऱ्यांना रेल्वे स्थानकावर सोडायला शासकीय वाहनांचा वापर!

By Admin | Published: May 18, 2017 01:37 AM2017-05-18T01:37:01+5:302017-05-18T01:37:01+5:30

अधिकाराचा दुरुपयोग : ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उघड झाला प्रकार

Government vehicles use to leave the railway station at the railway station! | अधिकाऱ्यांना रेल्वे स्थानकावर सोडायला शासकीय वाहनांचा वापर!

अधिकाऱ्यांना रेल्वे स्थानकावर सोडायला शासकीय वाहनांचा वापर!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासकीय वाहनांचा वापर केवळ शासकीय कामकाजाकरिताच व्हायला हवा, असा नियम असताना नियमित ‘अप-डाउन’ करणाऱ्या अधिकाऱ्यांना रेल्वे स्थानकावर सोडायला चक्क शासकीय वाहने जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने बुधवार, १७ मे रोजी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उघड झाला.
जिल्हा मुख्यालयी असलेल्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अनेक अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत कौटुंबिक प्रयोजनासह इतर कामांसाठीही शासकीय वाहने वापरत आहेत, अशी माहिती मिळाल्यावरून ‘लोकमत’ने त्याची शहानिशा करण्यासाठी बुधवारी दुपारी ४.१५ ते ५ वाजेदरम्यान वाशिमच्या रेल्वे स्थानकावर तळ ठोकला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना सोडायला (एमएच १२ पीए ४२९१) या क्रमांकाचे पिवळ्या रंगाचे शासकीय वाहन त्याठिकाणी आल्याचे निदर्शनास आले. त्यापाठोपाठ जलसंधारण विभागातील कार्यकारी अभियंता सोळंके आणि अन्य एका कर्मचाऱ्याला सोडण्याकरिता पांढऱ्या रंगाचे (क्रमांक एमएच २७ एए ०६१३) वाहन रेल्वे स्थानकासमोर थांबले. यावरून शासकीय वाहनांचा वापर चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये सिद्ध झाले. या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे.

शासकीय कामांसाठी वाहन वापरण्यास मनाई नाही. एकाच अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन जिल्ह्यांचा कारभार असल्यामुळे एखादवेळी रेल्वेस्थानकावर त्यांना सोडायला वाहन गेल्यास त्यातही हरकत नाही. मात्र, वैयक्तिक कामांसाठी वाहन वापरणे पूर्णत: चुकीचे आहे.
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Government vehicles use to leave the railway station at the railway station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.