राज्यपालांनी कारंजात घेतले गुरु माऊलींचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 06:04 PM2022-02-05T18:04:50+5:302022-02-05T18:06:30+5:30

Governor Bhagatsing Koshyari visits Guru Mauli in Karanja : श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदीर अर्थात गुरु मंदीराला भेट देन गुरु माऊली चरणी माथा टेकला.

Governor visits Guru Mauli in Karanja | राज्यपालांनी कारंजात घेतले गुरु माऊलींचे दर्शन

राज्यपालांनी कारंजात घेतले गुरु माऊलींचे दर्शन

googlenewsNext

वाशिम: आपल्या दोनदिवसीय विदर्भ दौऱ्यावर असलेले  राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी शनिवारी कारंजातील जगप्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदीर अर्थात गुरु मंदीराला भेट देन गुरु माऊली चरणी माथा टेकला. यावेळी संस्थानच्यावतीने त्यांचा गुरु माऊलीची मूर्ती, प्रमाणपत्र, प्रतिमा, गुरुचित्र पोथी, सवळ देऊन सत्कार करण्यात आला. 
विदर्भाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले महामहिम राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचे शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास  जिल्ह्यात आगमन झाले.  त्यांनी शिरपूर येथील जगप्रसिद्ध अंतरीक्ष पार्श्वनाथ मंदिरात दर्शन घेतले. 
 त्यानंतर वाशिम येथे शासकीय विश्रामगृहात अधिाकाऱ्यांशी विविध विषयावर संवाद साधला.  त्यानंतर  कारंजा येथे गुरुमंदिराला भेट देऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. 

यावेळी विश्वस्त मंडळाच्यावतीने आशा सोनटक्के, सुरेखा घुडे, स्मिता बरडे, मिनाक्षी खेडकर, श्रद्धा घुडे यांनी त्यांचे स्वागत केले, तर वेद पाठशाळेच्या विद्द्यार्थ्यांनी शांतीपाठ  करून राज्यपालांना आशीर्वाद दिले. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण खेडकर यांच्यासह वसंत स्वस्तकर, विनायक सोनटक्के, दिगंबर बरडे, कृष्णराव नांदेडकर, प्रकाश घुडे, अविनाश खेडकर, अतुल बरडे, निलेश घुडे आदिंची उपस्थिती होती. गुरुमाऊलीचे दर्शन घेऊन आपण धन्य झालो, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले, तसेच गुरुमाऊली सर्व जगाचे कल्याण करो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. राज्यपालांसोबत कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटण होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक गोरख झामरे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
 


पोलिसांचा चोख बंदोबस्त 
राज्यपालांच्या दोऱ्यानिमित्त कारंजा पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक  बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता. गुरु मंदीर परिसरासह वाशिम ते कारंजा मार्गावर मुख्य गावांच्या चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते

Web Title: Governor visits Guru Mauli in Karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.