वनोजा येथील राऊत महाविद्यालयात पदवीदान कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:28+5:302021-07-18T04:29:28+5:30
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालय येवदाचे प्राचार्य डॉ. वाय.जी. सिंह, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र ...
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालय येवदाचे प्राचार्य डॉ. वाय.जी. सिंह, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे यांनी महाविद्यालयाच्या संपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. प्राचार्य डाॅ. वाय.जी. सिंह म्हणाले की, पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी विविध परीक्षेसाठी पात्र ठरतात. त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्वही त्यांना पार पाडावे लागते. महाविद्यालयाच्या एकूण ३२ विद्यार्थ्यांनी पदवी मिळविल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. लहासे, प्रा. गजानन घोंगटे, प्रा. डॉ. ममता पाथ्रिकर, प्रा. जयप्रभा भगत, प्रा. भगत, लिपिक गणेश राऊत, तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डोंगरे यांनी, तर आभार प्रा. डॉ. बोरचाटे यांनी व्यक्त केले.