ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान

By संतोष वानखडे | Published: May 18, 2023 04:42 PM2023-05-18T16:42:30+5:302023-05-18T18:07:06+5:30

वाशिम : जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या २१ सदस्य पदासाठी तसेच दोन सरपंच पदासाठी १८ मे रोजी सकाळी ७:३० ...

Gram panchayat by-election average 48 percent polling till afternoon in washim | ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान

googlenewsNext

वाशिम : जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या २१ सदस्य पदासाठी तसेच दोन सरपंच पदासाठी १८ मे रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान झाले.

३१ डिसेंबर २०२२ पर्यंत विविध कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या एकूण ९२ रिक्त सदस्यांसाठी आणि ५ रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी येत्या १८ मे रोजी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. सदस्य पदाच्या ३१ जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. परिणामी ३१ पदे रिक्त राहतील.

सदस्य पदाच्या ४० जागेसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्याने या सदस्यांचा अविरोध होण्याचा मार्गही मोकळा झाला. आता १६ ग्रामपंचायतींच्या २१ सदस्य पदासाठी तसेच मानोरा तालुक्यातील कार्ली व गिरोली अशा दोन सरपंच पदासाठी १८ मे रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान झाले. १९ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: Gram panchayat by-election average 48 percent polling till afternoon in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.