ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी सोमवारपासून स्विकारले जाणार अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:33 PM2018-05-05T15:33:29+5:302018-05-05T15:33:29+5:30
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी २० ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, वाशिम जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी २० ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुषंगाने सोमवार, ७ मे पासून निवडणूक लढवू इच्छिणाºया उमेदवारांकडून अर्ज स्विकारले जाणार आहेत. ही प्रक्रिया १२ मे पर्यंत चालणार असून २७ मे रोजी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे.
ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार, ७ मे पासून १२ मे पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४.३० या कालावधीत इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज स्विकारले जातील. १४ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १६ मे रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. १६ मे रोजी दुपारी ३ वाजतानंतर निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येईल व अंतिमरीत्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास २७ मे २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान घेतले जाईल. २८ मे रोजी या निवडणूकीची मतमोजणी होऊन २९ मे पर्यंत निवडणुकीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.