Gram Panchayat Election : परंपरागत चिन्हांनाच उमेदवारांची पसंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 11:36 AM2021-01-06T11:36:30+5:302021-01-06T11:42:15+5:30

Gram Panchayat Election: अनेकांनी सिलिंडर, कपाट, टी.व्ही., कपबशी, फॅन अशा दैनंदिन वापरातील वस्तूंच्या चिन्हांचीच निवड केल्याचे दिसून आले.  

Gram Panchayat Election: Candidates prefer traditional symbols! | Gram Panchayat Election : परंपरागत चिन्हांनाच उमेदवारांची पसंती!

Gram Panchayat Election : परंपरागत चिन्हांनाच उमेदवारांची पसंती!

googlenewsNext
ठळक मुद्देयंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४० चिन्हांची वाढ केलेली आहे. भाजीपाला, मोबाइलचे चार्जर, संगणकाचे माउस अशाही काही चिन्हांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निवडणूक आयाेगाने लॅपटाॅप, पेनड्राइव्ह, हेडफाेन यासारख्या आधुनिक काळातील निवडणूक चिन्हांना मान्यता दिली असली, तरी चिन्हवाटपात उमेदवारांनी परंपरागत चिन्हांनाच पसंती दिल्याचे दिसून आले. अनेकांनी सिलिंडर, कपाट, टी.व्ही., कपबशी, फॅन अशा दैनंदिन वापरातील वस्तूंच्या चिन्हांचीच निवड केल्याचे दिसून आले.  दैनंदिन वापरातील वस्तूंची चिन्हे ग्रामीण भागातील जनतेच्या परिचयाची असल्याने उमेदवारांनी त्यांना पसंती दिल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ४ जानेवारी राेजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कारंजा ९५, मानाेरा १३१, रिसाेड २३३, वाशिम १९९, मालेगाव २२० आणि मंगरूळपीर येथील १५२ उमेदवारांनी माघार घेतली. सहा तालुक्यांतील १,०३० उमेदवारांनी माघार घेतल्याने १,४८७ जागांसाठी ३,२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.  निवडणूक आयोगाने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४० चिन्हांची वाढ केलेली आहे. त्यात भाजीपाला, मोबाइलचे चार्जर, संगणकाचे माउस अशाही काही चिन्हांचा समावेश आहे. पूर्वीच्या १५० चिन्हांऐवजी १९० निवडणूक चिन्हे आयाेगाने केली असली तरी उमेदवारांनी परंपरागत चिन्हांनाच पसंती दिल्याचे दिसून येत आहे.


दैनंदिन वापरातील चिन्हे
हेल्मेट, नेलकटर, मिक्सर, माइक, दुर्बीण, कढई, ब्रेड टोस्टर, उशी, फ्रीज, स्टॅपलर, सेफ्टी पीन अशा घरगुती व स्वयंपाकघरातील वापराच्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
सोबतच भेंडी, मका, वाटाणे, फुलकोबी, ढोबळी मिरची, आलं (अद्रक), हिरवी मिरची, अननस, कलिंगड, द्राक्षे, पेरू, नारळ अशा काही चिन्हांचाही समावेश करण्यात आला. 


प्रतिबंधात्मक आदेश लागू
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. तसेच १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रांवर १४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून ते १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाने निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांवर १८ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Web Title: Gram Panchayat Election: Candidates prefer traditional symbols!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.