Gram Panchayat Election : आज होणार लढतीचे चित्र स्पष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 10:48 AM2021-01-04T10:48:15+5:302021-01-04T10:48:20+5:30

Gram Panchayat Election: ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Gram Panchayat Election: The picture fight is clear today | Gram Panchayat Election : आज होणार लढतीचे चित्र स्पष्ट!

Gram Panchayat Election : आज होणार लढतीचे चित्र स्पष्ट!

Next
कमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. १४८७ जागेसाठी एकूण ४२५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत ४२४२ उमेदवारांनी ४३९० अर्ज सादर दाखल केले होते. छाननीत ८९ उमेदवारांचे १३४ अर्ज बाद झाल्याने ४१५३ उमेदवारांचे ४२५६ अर्ज कायम राहिले. एकूण १४८७ जागेसाठी ४२५६ उमेदवारांचे अर्ज दाखल असल्याने अनेक ठिकाणी तिरंगी लढतीचे संकेत आहेत. दरम्यान, बंडखोरी टाळण्यासाठी असंतुष्टांना खूश करण्याचा प्रयत्न पॅनलप्रमुखांकडून होत असल्याचे दिसून येते. उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी विविध प्रलोभणेही देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने राजकीय आखाडा चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत. या ग्रामपंचायतींकडे विशेष लक्षवाशिम तालुक्यातील काटा, अनसिंग, पार्डीटकमोर, तामशी, तोंडगाव, वारा जहॉंगीर, सावरगाव जिरे, वारला, रिसोड तालुक्यातील रिठद, चिखली, कवठा, गोभणी, मांगूळझनक, केनवड, वाकद, हराळ, मालेगाव तालुक्यातील शिरपूर, किन्हीराजा, जऊळका रेल्वे, चिवरा, मेडशी, तिवळी, डोंगरकिन्ही, मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ, शेलुबाजार, वनोजा, सायखेडा, मानोरा तालुक्यातील कारखेडा, इंझोरी, वाईगौळ, गादेगाव, कारंजा तालुक्यातील कामरगाव, उंबर्डाबाजार, धामणीखडी आदी ग्रामपंचायतींमधील प्रमुख लढती कशा राहतील, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. आज निवडणूक चिन्हांचेही वाटप होणारसोमवार, दि. ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. मतदारांना सहजरीत्या समजू शकेल, आकर्षित करू शकेल असे निवडणूक चिन्ह मिळावे, याकडे उमेदवारांचा कल असल्याची चर्चा आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मतदान, तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: Gram Panchayat Election: The picture fight is clear today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.