ग्रामपंचायत निवडणुकीने तापविले ‘राजकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:07 AM2017-09-06T01:07:09+5:302017-09-06T01:07:09+5:30

कारंजा लाड: ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण चांगले तापले असल्याचे दिसून येते. 

Gram Panchayat election results in 'Politics' | ग्रामपंचायत निवडणुकीने तापविले ‘राजकारण’

ग्रामपंचायत निवडणुकीने तापविले ‘राजकारण’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण चांगले तापले असल्याचे दिसून येते. 
ऑक्टोबर व डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या  कारंजा तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. तालुक्यातील खेर्डा कारंजा, वालई, जांब, गिर्डा या चार ग्रामपंचायतची हद्दवाढ झाल्यामुळे प्रभाग रचनेत फेरबदल करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया सुरू असल्याने त्या ग्राम पंचायतीच्या प्रभागरचनेसंदर्भात आक्ष्ेाप दाखल झाल्याने या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीची नवीन तारीख निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात येईल, असे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले. या वर्षी पहिल्यादांच सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने ही निवडणूक नेमकी कशी राहील, या बाबत जनमानसात संभ्रम दिसून येत आहे. यापूर्वी नगर परिषदेसाठी याच नियमावर आधारित नगराध्यपदाची निवड थेट जनतेतून घेण्यात आली. त्यावेळी पूर्वी काढलेले आरक्षण रद्द करून व संभाव्य सदस्यांच्या संख्येत एकाची वाढ करून नगराध्यक्ष पदाची निवडणुक थेट उमेदवारांनी लढविली. त्याच पृष्ठभूमीवर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लढविली जाईल की त्यात काही फेरबदल होईल, या बाबत मतदार संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येते. ७ ऑक्टोबरला मतदान होत असून, त्याकरिता १५ ते २२ सष्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.  ९ ऑक्टोबर रेाजी मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येईल. निवडणूक असलेल्या गावागावात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, गाव पुढारी मोर्चेबांधणीच्या कामाला आहे. यावर्षी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने सरपंच पदासाठी खर्चाची र्मयादा निश्‍चित केली असून, त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही निश्‍चित केल्याने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत येईल, अशी चिन्हे आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणूक पुढार्‍यांच्या तोंडपाठ असली तरी सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने मतदारासोबत पुढार्‍यातही याबाबत संभ्रम अवस्था दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.  याबाबत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदस्य संख्या कायम राहून सरपंच पदासाठी स्वतंत्र उमेदवार निवडणूक लढवेल. तर यापूर्वी सरपंच पदासाठी काढलेले आरक्षणच कायम राहील, अशी माहिती तहसिलदारांनी दिली. 

Web Title: Gram Panchayat election results in 'Politics'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.