ग्रामपंचायत निवडणूक; उमेदवारांचा आज फैसला

By admin | Published: August 6, 2015 12:48 AM2015-08-06T00:48:04+5:302015-08-06T00:48:04+5:30

निवडणुकीची मतमोजणी ६ ऑगस्ट रोजी होणार; उत्सुकता शिगेला.

Gram Panchayat elections; The candidates today decide | ग्रामपंचायत निवडणूक; उमेदवारांचा आज फैसला

ग्रामपंचायत निवडणूक; उमेदवारांचा आज फैसला

Next

वाशिम : जिल्ह्यात १६३ पैकी नऊ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५४ ग्रामपंचायतींची सार्वत्निक निवडणूक व एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक ४ ऑगस्ट रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ७३.५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीची मतमोजणी ६ ऑगस्ट रोजी होणार असून, मतदारांनी कोण्या उमेदवाराला, पॅनलला कौल दिला, हे स्पष्ट होणार आहे. वाशिम तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमध्ये १८३ जागांसाठी झालेले मतदान ७७.५८ टक्के होते तसेच रिसोड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमध्ये २९0 जागांसाठी ७६.0३ टक्के, मालेगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये २0६ जागांसाठी ७३.४३ टक्के, कारंजा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये २१४ जागांसाठी ६८.६६ टक्के, मानोरा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमध्ये १६२ जागांसाठी ६९.८३ टक्के व मंगरूळपीर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींमध्ये १७२ जागांसाठी ७३.0६ टक्के मतदान झाले. वाशिम तालुक्यातील ४८६८५, रिसोड तालुक्यातील ६४९४४, मालेगाव ४९३९२, मंगरुळपीर ३८६७३, कारंजा ४१२0४, तर मानोरा तालुक्यातील ३५७0६ मतदारांपैकी अनुक्रमे ३७७७0, ४९३७९, ३६२७0, २८२५४, २८२९१, २४९३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणार्‍यांमध्ये ७४.३८ टक्के पुरुष तर ७२.६३ टक्के महिलांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील १५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर ६ ऑगस्ट रोजी मतमोजणीत कोणत्या पॅनलला मतदारांनी कौल दिला, हे स्पष्ट होईल. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेऊन जोरदार फिल्डिंग लावली होती. यामध्ये खासदार, आमदार व गावपातळीवरील नेत्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. आपल्याच पॅनलचे उमेदवार निवडून यावे, यासाठी रणनीती आखण्यात आली होती. बर्‍याच गावांमध्ये राजकीय मंडळींनी सभा घेऊन पॅनलचे ध्येयधोरण स्पष्ट केले होते. जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या व अटीतटीच्या निवडणुकीत कोणाचा विजय होतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनसिंग, मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार यांसह रिसोड, कारंजा तालुक्यातील काही गावांमध्ये निवडणूक रंगात होती. या ठिकाणी मतदारांनी मतदानही मोठय़ा प्रमाणात केले. नेमके मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, याकडे गावातील जनतेचे लक्ष लागले आहे. अनेक गावांमध्ये अमक्या-तमक्या पॅनलचा विजय होणार असल्याच्या पैजा लावण्यात येत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Gram Panchayat elections; The candidates today decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.