वेतनश्रेणी, पेन्शनच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 04:01 PM2019-05-31T16:01:06+5:302019-05-31T16:01:10+5:30
ग्रामपंचायतीच्या कर्मचारी व त्यांचे कुटुंब येत्या निवडणुकीत मतदान करणार नाही, तसेच काम बंद आंदोलन छेडून अधिवेशन काळातही आमरण उपोषण करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव ( वाशीम): तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये काम करणाºया कर्मचाºयांना वेतनश्रेणी व पेन्शन मिळण्यासाठी वारंवार आंदोलने झाली मात्र याचा काही फायदा झाला नाही अद्यापही अनेक कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर्मचारी व त्यांचे कुटुंब येत्या निवडणुकीत मतदान करणार नाही, तसेच काम बंद आंदोलन छेडून अधिवेशन काळातही आमरण उपोषण करणार आहेत. याबाबत त्यांनी आमदार अमित झनक यांना निवेदन दिले आहे.
मालेगाव आणी रिसोड तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायती मध्ये काम करीत असलेल्या सुमारे ६० हजार कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या वीस वषार्पासून प्रलंबित आहे ग्रामपंचायत कर्मचाºयांना नियमित कर्मचाºयांप्रमाणे वेतन व पेन्शन मंजूर करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने मोर्चे केले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. ग्रामपंचायत कर्मचाºयांना नगरपंचायतच्या कर्मचाºयांप्रमाणे वेतनश्रेणी भत्ते, पेन्शन घेण्यासंदर्भात ठराव झाला होता, तसा अहवालही सादर केला होता सदर शिफारशी तपासून ग्रामपंचायत कर्मचाºयांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, असे ठरले होते मात्र अद्यापही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे सकारात्मक धोरण अवलंबून राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांना वेतन ग्रामपंचायत कर्मचाºयांना पेन्शन देण्यात यावे, डॉ. केळकर यांच्या समितीने सन २००९ मध्ये शासनास सादर केलेल्या अहवालानुसार ग्रामविकास विभागाने तात्काळ हा निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील साठ हजार कर्मचारी व त्यांचे कुटुंब येत्या विधानसभा निवडणूकीत मतदान करणार नाही, तसेच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि अधिवेशन काळातहीआमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदन रिसोड तालुक्यातील व मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने आमदार अमित झनक यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे रिसोड तालुकाध्यक्ष गंगाधर बोरकर, रिसोड तालुका सहसचिव सुनिल लोखंडे, रिसोड तालुका उपाध्यक्ष जमशेद पठाण, मालेगाव तालुका अध्यक्ष संजय नखाते, मालेगाव तालुका सचिव प्रमोद सांगळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.