मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:49 PM2018-05-02T13:49:16+5:302018-05-02T13:49:16+5:30

१ मे या कामगारदिनी  तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र दिनाचा झेंडा फडकावून पंचायत समिती कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले.

Gram Panchayat employees agitation in Malegaon taluka | मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन 

मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन 

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामपंचायत कर्मचारीविरोधी शासकीय धोरणाविरुद्ध ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांत शासनाविषयी रोष.शासनाने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष दिले नाही, असा आरोप करीत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने १ मे रोजी धरणे आंदोलन केले. 

मालेगाव : ग्रामपंचायत कर्मचारीविरोधी शासकीय धोरणाविरुद्ध ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांत शासनाविषयी रोष असून शासनाने वेतनश्रेणी व सेवानिवृ्त्त वेतनबाबत निर्णय घेतला नसल्याचे कारण समोर करीत १ मे या कामगारदिनी मालेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र दिनाचा झेंडा फडकावून पंचायत समिती कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले.

ग्रामपंचायत कर्मचाºयांना वेतनश्रेणी व सेवानिवृ्त्त वेतन  मिळण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्य शासनासोबत संघर्ष सुरू आहे. त्यासाठी यापूर्वी आंदोलनाचा मार्गही अवलंबिण्यात आला होता. मात्र, अद्याप शासनाने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष दिले नाही, असा आरोप करीत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने १ मे रोजी धरणे आंदोलन केले. 

यापूर्वी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन नियमित मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनच्या आंदोलनात्मक पवित्रा व पाठपुराव्याने महाराष्ट्र शासनाचे २ आॅगस्ट २०१७ रोजी समिती गठीत केली. या समितीला तीन महिन्यात आपला अहवाल सादर करण्याची मुदत दिली होती. मात्र वेळकाढू धोरणाचा अवलंब करुन समितीने नोव्हेंबर २०१७ ला अहवाल देणे अपेक्षीत असताना मुदत संपल्यानंतर पाच महिने झाले तरी अद्याप अहवाल शासनाकडे सादर केला नाही. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतनश्रेणी व पेन्शन मिळण्यास विलंब होत आहे. म्हणून मालेगाव तालुक्यातील ग्रा.पं.कर्मचाऱ्यांनी  कामबंद आंदोलन  आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी  तालुका अध्यक्ष  संजय तुकाराम नखाते, सचिव प्रमोद सांगळे, विजय जाधव, मुरलीधर लादे, भास्कर डोंगरदिवे, रामेश्वर आंबडे, रवि मांजरे, सुदाम लांडकर, अनिल जाधव, योगेश राउत, विलास गवळी, गजानन उगले, निर्मल धामने, सतीश साबळे, विलास गवळी, अरविंद इंगळे, यशवंत सुर्वे मनोहर भगत, उल्हास राठोड,Þ अरुण चव्हाण, जगदीश गवइर्, राजू कदम विजय जाधव, रामचंद्र चव्हाण, गजानन पाचरने आदि सहभागी झाले होते. यावेळी गट विकास अधिकारी संदीप कोटकर यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Gram Panchayat employees agitation in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.