ग्रामपंचायतचा चेंडु आता मतदाराच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 07:51 PM2017-10-05T19:51:49+5:302017-10-05T19:52:40+5:30

मानोरा : मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४१ ग्रामपंचायतच्या निवणुका होत आहे. त्यामध्ये हातना ग्रामपंचायत अविरोध झाल्याने ४० ग्रामपंचायतचा निवडणुक प्रचार अंतीम टप्यात पोहोचला आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी माजी सरपंच आता मतदाराच्या दारात उभा ठाकला आहे.

Gram panchayat ka chandu now in the voter's court | ग्रामपंचायतचा चेंडु आता मतदाराच्या कोर्टात

ग्रामपंचायतचा चेंडु आता मतदाराच्या कोर्टात

googlenewsNext
ठळक मुद्देविकासाचा मुद्दा ऐरणीवर व्हाटसअप, फेसबुकवरती होत आहे प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४१ ग्रामपंचायतच्या निवणुका होत आहे. त्यामध्ये हातना ग्रामपंचायत अविरोध झाल्याने ४० ग्रामपंचायतचा निवडणुक प्रचार अंतीम टप्यात पोहोचला आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी माजी सरपंच आता मतदाराच्या दारात उभा ठाकला आहे.
ग्रामपंचायतची निवडणुक प्रचार अंतीम टप्यात पोहोचला आहे. त्यामुळे आपल्या गटाचा सरपंच व्हावा यासाठी गाव पुढाºयांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. गत पंचवार्षीकला सत्तेत असलेल्या गाव पुढाºयाला  मतदार आता विकासाबाबत प्रश्न विचारत आहे. या वेळेस सरपंच थेट जनतेतुन असल्यामुळे अनेक दिग्गजांनी  यावेळी सरपंच पदासाठी निवडणुक रिंगणात उडी घेतली खरी,पण मताचा जोगवा मागतांना कमालीची दमछाक होत आहे. अनेक ठिकाणी तिरंगी लढत असल्यामुळे निवडणुक  कठीण झाली आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी ते माघारी घेण्यापर्यंत उमेदवाराला  आधी ताकद तहसील कार्यालयात खर्च  न करावी लागली. त्यामुळे  मतदारांच्या दारात जाण्यासाठी  उमेदवाराला  वेळ कमी पडत आहे. त्यामुळे  सोशल मिडीयाच्या माध्यमातुन प्रचार चालला आहे. आपली  बाजु व्हाटसअप च्या माध्यमातुन मतदारापर्यंत पोहोचविणे चालु आहे.

बाहेरील मतदान ठरणार निर्णायक
ग्रामपंचायत निवडणुकसाठी उमेदवाराला विजयी करण्यासाठी बाहेरील मतदान निर्णायक ठरणार आहे. अनेक गावातील शेकडो मतदार  बाहेर  गावी आहे. मतदार यादीत नावे जरी असली तरी ते अनेक वर्षापासून मुंबई ,पुणे येथे स्थायीक झाले आहे. त्याचा फायदा घेत बाहेरील मतदान त्याच्या नातेवाईकांच्या माध्यमातुन आणण्याचे प्रयत्न चालु  आहे ते मतदान झाल्यास निर्णय ठरु शकते.

Web Title: Gram panchayat ka chandu now in the voter's court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.