थकीत करदात्यांना ग्रामपंचायतची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:22 PM2018-08-18T13:22:09+5:302018-08-18T13:22:54+5:30
कोहीनुर जिनिंग अॅन्ड प्रेसिंग व सत्यम विक्टोरिंग अॅन्ड अॅग्रो प्रेसींगकडे मागील कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीचे तब्बल ५ लाख ४० हजार ६२८ रुपये कर थकीत आहे. सदर थकीत करवसुलीसाठी त्वरित भरण्यात यावी याबाबत नोटीस ग्रामपंचायतच्यावतिने बजावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : विठोली ग्रामपंचायतीच्या हद्ीत येणाºया कोहीनुर जिनिंग अॅन्ड प्रेसिंग व सत्यम विक्टोरिंग अॅन्ड अॅग्रो प्रेसींगकडे मागील कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीचे तब्बल ५ लाख ४० हजार ६२८ रुपये कर थकीत आहे. सदर थकीत करवसुलीसाठी त्वरित भरण्यात यावी याबाबत नोटीस ग्रामपंचायतच्यावतिने बजावण्यात आली आहे. मुदतीत कराचा भरणा न झाल्यास २४ आॅगस्ट रोजी मालमत्ता जप्ती करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
मागील कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर थकीत आहे. थकीत कराचा भरणा करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने १७ एप्रिल रोजी रितसर नोटीस बजावली मात्र, करदात्यांनी याकडे दुर्लक्ष केले. नोटीसव्दारे मुदतीनंतरही दोन्ही जिनिंग मालकांनी ग्रा्रमपंचायतीना थकीत कराचा भरणा केला नाही, परिणामी गावातील नागरीकांनीही ग्रामपंचायतीचा कर भरण्यास नकार दिला . त्यामळे ग्रामपंचायतचा कर मोठया प्रमाणात थकीत राहिला. आता प्रशासन थकीत कर वसुलीसाठी कामाला लागले असून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १२९ नुसार थकीत कराचा भरणा न केल्यास २४ आॅगस्ट रोजी कोहीनुर जिनिंग अॅन्ड प्रेसिंग व सत्यम विक्टेरिंग अॅन्ड अॅग्रो विरुद्ध कारवाई केल्या जाणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.