ग्रामपंचायतने केला महावितरणचा थकीत भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:33+5:302021-07-09T04:26:33+5:30

ग्रामपंचायत भवनाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे ग्रामवासीयांची दहा दिवसांपासून असुविधा निर्माण झाली होती. या आशयाचे वृत्त ...

Gram Panchayat pays the arrears of MSEDCL | ग्रामपंचायतने केला महावितरणचा थकीत भरणा

ग्रामपंचायतने केला महावितरणचा थकीत भरणा

Next

ग्रामपंचायत भवनाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे ग्रामवासीयांची दहा दिवसांपासून

असुविधा निर्माण झाली होती. या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये वृत्त

प्रकाशित होताच पैशांची तरतूद ग्रामपंचायत प्रशासनाने करून गुरुवारला अंशत:

थकबाकीचा धनादेश महावितरण कारंजा यांचेकडे ग्रामविकास अधिकारी काजळेश्वर यांनी दिल्याने गामस्थांची पाणी समस्या सुटणार आहे.

काजळेश्वर ग्रामपंचायतकडे महावितरणचे थकीत बिल असल्याने महावितरणने

काजळेश्वर सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या रोहित्रावरून

विद्युत २९जून रोजी खंडित केली. त्यामुळे ग्रामस्थांची नळ योजना बंद पडली. सद्या कामाचे दिवस असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी

दहा दिवस पायपीट झाली.

लोकमतने सदरचे वृत्त प्रकाशित केले,

त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने

दखल घेत जमेल तेवढा निधी महावितरणला ग्रामविकास अधिकारी सतीश वर्घट यांनी धनादेशाने अंशत:

सुपुर्द केला. त्यामुळे महावितरण

ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग काजळेश्वरची विद्युत नियमित करणार असून गावकऱ्यांची पाणी समस्या सुटणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेली दखल व गावकऱ्याचा सहयोग यामुळे पाणी समस्या सद्यातरी सुटत असल्याने प्रहार मुख्य सेवक प्रदीप उपाध्ये यांनी गावकऱ्यांचे वतीने समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामस्थाकडे करापोटी मोठी

वसुली बाकी आहे. ग्रामस्थांची पाणी समस्या सुटावी करिता मनापासून प्रयत्न करीत आहोत. अंशत: महावितरण कारंजाला धनादेश दिला.

महावितरणला विनंती करून ग्रामस्थाची पाणी समस्या सोडविण्याचा मनापासून प्रयत्न केला. महावितरणने सहकार्य दिले आहे.

सतीश वर्घट

ग्रामविकास अधिकारी काजळेश्वर

Web Title: Gram Panchayat pays the arrears of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.