ग्रामपंचायतीच्या लाखो रुपये कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 07:58 PM2017-08-01T19:58:28+5:302017-08-01T19:59:28+5:30

Gram panchayat tired millions of rupees | ग्रामपंचायतीच्या लाखो रुपये कर थकीत

ग्रामपंचायतीच्या लाखो रुपये कर थकीत

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामसेवकांना पडला जबाबदारीचा विसर ‘नॉट रिचेबल’ राहणा-या ग्रामसेवकांमुळे नागरिक त्रस्तसरपंच व सदस्य यांच्या समन्वयातून विकास व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा  :  ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला असून मुख्यालयी न राहता शहरातूनच आपला कारभार करतात. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचा लाखो रुपयाचा कर थकीत आहे तसेच अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामसेवकांचे फोन बदं राहत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शासनाच्यावतीने विकास कामासाठी ग्रामपंचायतीला मोठे अधिकार दिले आहेत. गावातील मुलभूत विकासासाठी लाखो रुपये निधी येतो. १३ व्या, १४ व्या, वित्त आयोगाची कामे सुध्दा केली जातात. त्याचबरोबर विविध प्रकारची करवसुली सुध्दा ग्रामेवकांना करावी लागते, घरकुल, शौचालय, विहीरीची कामे त्या कामावरील रक्कम मिळण्यासाठी ग्रामसेकांना शोधावे लागते. ग्रामसेवकांनी गावात भेटी देण्यासाठी दिवस ठरविले आहेत. मात्र बहूतांश ग्रामसेवक आपल्या कार्यक्षेत्रात येणाºया गावात जातच नाही.त्यामुळे नागरिकांना त्यांना भेटण्यासाठी पंचायत समिती यावे लागते. येथे आल्यावर त्यांची भेट घेत नाही. फोनवर संपर्क केला असता त्यांचा फोन बंद असतो.त्यामुळे एखादे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागतो. गाव हागणदारी मुक्त करणे, यासाठी ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची असते, मात्र अनेक गावात आजही  उघड्यावर शौचास बसणारांची संखया कमी नाही. बहूतांश गावातील करवसुली थकलेली आहे.
 शासनाने एक दिवस वसुलीचा असा कार्यक्रम राबवून गटविकास अधिकारी व ग्रामसेवक लोकांच्या घरापर्यंत गेले होते. याला प्रतिसाद मिळत लाखो रुपयाची वसुली झाली होती. मात्र हा कार्यक्रम सध्या थंड पडला आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची आहे सरपंच व सदस्य यांच्या समन्वयातून विकास व्हावा अशी अपेक्षा नागरिकात व्यक्त होत आहे. 
शासनाच्यावतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम युध्द पातळीवर सुरु आहे. गतवर्षी लावलेली झाडे यावर्षीपर्यंत जगलीच नाही, पुन्हा यंदा वृक्षारोपण करण्यात आले. पुढच्या वर्षीही करण्यात येईल् मात्र झाडांची संखया वाढतांना दिसत नाही. याबाबत ग्रामसेवकांनी गंभीर असावे, काही ग्रामपंचायती लोकसंख्या  तेवढी झाडे,  हा उपक्रम राबवित आहेत तर काही ग्रामपंचायती मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यास इच्छुक आहे.  मात्र त्यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेणे गरजचे आहे. 
यासंदर्भात नव्यानेच येथे रुजु झालेले गटविकास अधिकाराी ज्ञानेश्वर ताकरस यांनी लक्ष द्यावे अशी जनतेची अपेक्षा आहे.
 

Web Title: Gram panchayat tired millions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.