ग्रामपंचायत गैरप्रकारप्रकरणी आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:14 AM2017-08-09T02:14:34+5:302017-08-09T02:14:52+5:30
राजूरा : येथील ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच व सचिवांनी ग्रामपंचायत कामकाजात गैरप्रकार व अनियमिता झाल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्यापही कुठलीच कारवाई न झाल्याने येत्या १४ ऑगस्ट पर्यंत सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राजुरा येथील मनिष दत्तराव मोहळे यांनी ८ ऑगस्ट रोजी संबंधितांना निवेदनाद्वारे दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूरा : येथील ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच व सचिवांनी ग्रामपंचायत कामकाजात गैरप्रकार व अनियमिता झाल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्यापही कुठलीच कारवाई न झाल्याने येत्या १४ ऑगस्ट पर्यंत सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राजुरा येथील मनिष दत्तराव मोहळे यांनी ८ ऑगस्ट रोजी संबंधितांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मनिष मोहळे यांनी ६ एप्रिल २0१५ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांच्यासह वरिष्ठाकडे नमुद तक्रारीत राजुरा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व सचिवांनी जनतेची दिशाभूल करुन खोट्या स्वाक्षरीद्वारे बनावट ठराव पारित करुन नजीकच्या पिंपळवाडी येथील ग्रामस्थांना अतिक्रमणीत वनजमीनीचा नाहरकतीचा ठराव देण्यात आला, तर तंटामुक्त गाव समितीच्या प्राप्त निधीतून खरेदी करण्यात आलेल्या सौरउर्जा दिवे खरेदीतही गैरप्रकार केल्याचे म्हटले आहे. शिवाय ग्रामपंचायतीच्यावतीने वसुल करण्यात आलेल्या घरकर, कोंडवाडा, अनामत जमा खर्चाच्या व्यवहारातही मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार करण्यात आल्याचे नमुद आहे. याशिवाय इतर कामकाजातही अनियमितता असल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी विरु ध्द कारवाई करण्याची मागणी मनिष मोहळे यांनी ६ एप्रिल २0१५ रोजी संबंधीतांकडे केली होती. त्यानंतर सदर प्रकरणाची मालेगाव पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्यांकडून चौकशी करुन चौकशी अहवाल तक्रारकर्त्यासह वरिष्ठांकडे सादर सुध्दा करण्यात आला होता.चौकशीअंती तत्कालीन सरपंच व सचिवांनी ग्रामसभेचा कोरमपूर्ण नसतानाही नियमबाह्य ठराव पारित करीत बरेच कामात अनियमितता केल्याचे आढळुन आले होते. मात्र दोन वर्षांतही वरिष्ठ अधिकार्यांनी कारवाई केली नसल्याचा आरोप मनिष मोहळे यांनी केला आहे. सदर प्रकरणात वारंवार लेखी निवेदन, स्मरण पत्राव्दारे अनेकदा मागणी केली मात्र काहीच झाले नाही. अखेर न्यायासाठी आंदोलनाचा पावित्रा मनिष मोहळे यांनी घेत, येत्या १४ ऑगस्टपर्यंंत सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, या संदर्भात मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महागावकर यांच्याकडून माहिती घेतली असता राजुरा ग्रामपंचायतीलमधील या गैरप्रकाराची तक्रार ही आपल्या कार्यकाळातील नाही. ती आपण रुजू होण्यापूर्वीची ुअसल्यामुळे याबाबत विस्तार अधिकार्यांकडून सवीस्तर मीिती घेऊन कारवाईची दिशा ठरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.