‘मिळकत पत्रिके’मुळे ग्रामपंचायतींची कर आकारणी होणार सुलभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:58+5:302021-03-07T04:37:58+5:30

वाशिम : ‘स्वामित्व’ योजनेंतर्गत ‘ड्रोनद्वारे’ जिल्ह्यातील ६४१ गावांतील गावठाणांचे सर्वेक्षण केले जाणार असून, संबंधित नागरिकांना जागेची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी ...

Gram Panchayat's tax collection will be easier due to 'Income Papers'! | ‘मिळकत पत्रिके’मुळे ग्रामपंचायतींची कर आकारणी होणार सुलभ !

‘मिळकत पत्रिके’मुळे ग्रामपंचायतींची कर आकारणी होणार सुलभ !

googlenewsNext

वाशिम : ‘स्वामित्व’ योजनेंतर्गत ‘ड्रोनद्वारे’ जिल्ह्यातील ६४१ गावांतील गावठाणांचे सर्वेक्षण केले जाणार असून, संबंधित नागरिकांना जागेची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) मिळणार आहे. यातून मिळकतीचे क्षेत्र, सीमा निश्चित होणार असल्याने ग्रामपंचायतींना कर आकारणी करणे सुलभ होणार आहे.

ग्रामीण भागातील गावठाणांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे, तसेच त्याचा नकाशा व सीमा याविषयी माहिती नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून गावठाणातील जागाधारकांच्या जमिनीचे मोजमाप करून त्याचा मालकी हक्क अधिकृतपणे देण्यासाठी जिल्ह्यात स्वामित्व योजना राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत ड्रोनद्वारे जिल्ह्यातील ६४१ गावांमधील गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती आहेत. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक मिळकतीचे क्षेत्र, सीमा निश्चित होणार असल्याने ग्रामपंचायतींना कर आकारणी करताना मदत होणार आहे. जितके क्षेत्र, त्या प्रमाणातच कर भरावा लागणार आहे. सर्व मिळकती कराच्या व्याप्तीमध्ये येणार असल्याने ग्रामपंचायतींच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Gram Panchayat's tax collection will be easier due to 'Income Papers'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.