वृक्ष लागवड मोहिमेसाठी ग्रामपंचायतींना देणार प्रोत्साहन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 03:53 PM2018-06-08T15:53:11+5:302018-06-08T15:53:11+5:30
वाशिम : आगामी जुलै महिन्यात लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त झाडे लावणाºया ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम वाशिम जिल्हा परिषदेतर्फे राबविला जाणार आहे.
वाशिम : आगामी जुलै महिन्यात लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त झाडे लावणाºया ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम वाशिम जिल्हा परिषदेतर्फे राबविला जाणार आहे. सहा तालुक्यांतील गुणानुक्रमे प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींची यासाठी निवड करण्यात येईल. वृक्ष लागवड मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया ग्रामपंचायतींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविणारी वाशिम जिल्हा परिषद ही अमरावती विभागात पहिली ठरणार असल्याचा दावा करण्यात आला.
येत्या १ ते ३१ जुलैदरम्यान महाराष्ट्रात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्याला १३ लाख ८८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांचादेखील सक्रिय सहभाग राहणार आहे. वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी गटविकास अधिकाºयांचा आढावा घेऊन वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टांबाबत सूचना दिल्या होत्या. स्वतंत्र परिपत्रक काढून वृक्ष लागवडीची जबाबदारी गटविकास अधिकाºयांवर सोपविली असून, ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येएवढी झाडे लावण्याचा निर्धार केला. वृक्ष लागवडीसंदर्भात स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी यावर्षीपासून अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त झाडे लावणाºया ग्रामपंचायतींचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी सहा तालुक्यांतील गुणानुक्रमे प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींची निवड केली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणे, वृक्ष दिंडी काढून प्रौढ व्यक्तींचा सहभाग वाढविणे असे उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.