मालेगाव येथे नाफेडमार्फत हरभरा खरेदीस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:10 PM2018-03-28T14:10:10+5:302018-03-28T14:11:45+5:30

मालेगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात २७ मार्चला नाफेडच्या शेतमाल खरेदीअंतर्गत काटा पुजनाचा कार्यक्रम झाला. तसेच २८ मार्चपासून चना खरेदीस प्रारंभ करण्यात आला.

Gram procurement started by Nafed at Malegaon | मालेगाव येथे नाफेडमार्फत हरभरा खरेदीस प्रारंभ!

मालेगाव येथे नाफेडमार्फत हरभरा खरेदीस प्रारंभ!

Next
ठळक मुद्दे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे, यासाठी नाफेडने खरेदी प्रक्रिया सुरू केली. प्रथम १० शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे खरेदी प्रक्रिया सुरू झाल्याचे संदेशही पाठविण्यात आले. प्रति शेतकरी हेक्टरी ४ क्विंटलची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.


मालेगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात २७ मार्चला नाफेडच्या शेतमाल खरेदीअंतर्गत काटा पुजनाचा कार्यक्रम झाला. तसेच २८ मार्चपासून चना खरेदीस प्रारंभ करण्यात आला.
मालेगाव तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे, यासाठी नाफेडने खरेदी प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी प्रथम १० शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे खरेदी प्रक्रिया सुरू झाल्याचे संदेशही पाठविण्यात आले. नाफेडच्या येथील केंद्रावर चना विक्रीसाठी तालुक्यातील २१०० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. चना या शेतमालास ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात असून प्रति शेतकरी हेक्टरी ४ क्विंटलची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
तत्पुर्वी २७ मार्चला झालेल्या काटापुजन कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे, तालुका खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष भगवानराव शिंदे, डीएमओ तºहाळे उपस्थित होते. दरम्यान, नाफेडमार्फत चना खरेदीची सुरूवात झाल्याने शिरपूर, वसारी, तिवळी, मिर्झापूर, पांगरखेडा यासह तालुक्यातील इतर गावांमधील शेतकऱ्यां मध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

Web Title: Gram procurement started by Nafed at Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.