मर रोगामुळे हरभरा उत्पादक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 03:19 PM2019-12-23T15:19:06+5:302019-12-23T15:19:20+5:30
गत आठवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गेल्या आठवड्यात वातावरणातील बदलामुळे पश्चिम वºहाडात अवकाळी पावसानंतर जमिनीतील आर्द्रता वाढली आहे. त्यातच गत आठवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यातच किडींचाही प्रादुर्भाव वाढल्याने पीक संकटात सापडले आहे.
पश्चिम वºहाडात यंदा सप्टेंबरच्या अखेरीस आणि आॅक्टोबरच्या मध्यंतरी चांगला पाऊस पडल्याने जलप्रकल्पांतीलसाठा वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी आधार झाला होता. त्यातच आॅक्टोबरच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आलेल्या अवकाळी पावसामुळे प्रकल्प काठोकाठ भरल्याने रब्बी पिकांसाठी मोठा आधार झाला. यामुळेच तिन्ही जिल्ह्यांत रब्बी पिकांची पेरणी झपाट्याने सुरु झाली. त्यात गहू आणि हरभरा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. तथापि, अवकाळी पावसामुळे जमिनीची आर्द्रता वाढल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करताना बियाणे सुरक्षीत राहावेत, झाडांचीर रोगप्रतिकार क्षती वाढावी म्हणून बियाण्यांवर प्रक्रिया करणे गरजेचे होते. बहुतांश शेतकºयांनी याची काळजी घेतली नाही. आता जमिनीतील ओलाव्यामुळे बुरशी तयार होऊन हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव होत आहे. त्यातच धुक्यामुळे या पिकावर पाने खाणाºया अळीसह विविध किडींचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने हरभरा उत्पादक संकटात सापडले आहेत. यावर नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तातडीने उपाय योजना करण्याचा सल्ला कृषीतज्ञांकडून देण्यात येत आहे.
अवकाळी पावसामुळे शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला ओलावा, हेच हरभºयावरील मर रोगाचे कारण आहे. अशा वातावरणात पेरणी करण्यापूर्वी शेतकºयांनी बियाण्यांवर प्रक्रिया करणे गरजेचे असते. बहुतांश शेतकºयांनी ही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळेच मर रोगाचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे.
-डॉ. रविंद्र काळे
कृषी शास्त्रज्ञ तथा प्रमुख
कृषी विज्ञान केंद्र, वाशिम