प्रिंप्री येथे पोलिस बंदोबस्त ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 02:25 PM2018-08-25T14:25:06+5:302018-08-25T14:26:19+5:30
मंगरुळपीर : तालुक्यातील पिंप्री बु ,खरबी, मोझरी गटग्रामपंचात येथे पोलीस बंदोबस्ता ग्रामसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब ठाकरे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : तालुक्यातील पिंप्री बु ,खरबी, मोझरी गटग्रामपंचात येथे पोलीस बंदोबस्ता ग्रामसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब ठाकरे होते.
ग्रामसभेमध्ये मागील सभेचे वाचन , प्रपत्र ड यादीचे वाचन यादीमध्ये पात्र लाभार्थ्याचे नाव नसल्यास त्यांचे नाव समाविष्ट करणे व सर्व नावे आवास अॅपमध्ये नोंदणी करणे , घरकुलामध्ये जागा उपलब्ध नसलेल्या घरकुल लाभार्थ्याचे अतिक्रमण नियमानुकल करणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कराचा भरणा केल्याशिवाय तक्रार दाखल न करून घेणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष हनुमान सोनाने यांची ग्रामसभेतून निवड करण्यात आली. या ग्रामसभेला मुख्याध्यापक वा.का.महल्ले तलाठी चितमपली ,आरोग्यसेवक आर.डी. चव्हाण, डि.एल. राउत, प्रमिला सोनोने, उज्वल भगत, अंबादास राठोड, रानकन्या भगत व सर्व ग्रा.प. सदस्य, सचिव सिमा सुर्वे आदी उपस्थित होते. ग्रामसभेस कृषी सहाय्यक सुवर्,े मुख्याध्यापक पवार, अघम हे गैरहजर होते .याठिकाणी अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त होता . हजेरीपटावार १५५ स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत.
ग्रामसभा पुन्हा घेण्यासंदर्भात सदस्यांसह ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
मंगरुळपीर : तालुक्यातील पिंप्री बु. येथील ग्रामसभा रद्द करून पुन्हा घ्यावी व दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी ग्राम पंचायत् सदस्यांसह पिंप्री, मोझरी, खरबी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर ग्राम पंचायत सदस्य विलास ठाकरे, वैशाली खोडके, आश्विनी डोंगरे यांच्यासह किशोर लांडकर, सतीश राठोड, संतोष ठाकरे, अविनाश परंडे, शैलेश राठोड, योगेश राठोड, रुपेश ठाकरे, ज्ञानेश्वर खिराडे, लखन भगत, विरेश्वर मोरडे, गणेश ठाकरे, शंकर ठाकरे, ओम राठोड, मनोहर ठाकरे यांचेसह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत.