कारंजा तालुक्यात ८ ठिकाणी पार पडल्या उपग्रहाद्वारे ग्रामसभा
By admin | Published: April 6, 2017 08:28 PM2017-04-06T20:28:50+5:302017-04-06T20:28:50+5:30
कारंजा तालुक्यातील निवडक ८ गावामध्ये उपग्रहाद्वारे विशेप ग्रामसभा पार पडल्या.सिनेअभिनेता अमीर खान सह ईतर कलाकारांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
सिनेअभिनेता अमीर खान सह ईतर कलाकारांनी साधला गावकऱ्यांशी संवाद
कारंजा लाड : पाणी फांउडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा" करीता कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत कारंजा तालुक्यातील १३६ ही गावांनी सहभाग नोंदविला यापैकी १०६ गावानी पाणी फाउंडेशनचा प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण केला. कारंजा तालुक्यातील निवडक ८ गावामध्ये उपग्रहाद्वारे विशेप ग्रामसभा पार पडल्या. या ग्रामसभांमध्ये पाणी फांउडेशनचे संस्थापक तथा सिनेअभिनेता अमीर खान व पाणी फांउडेशनचे राज्य समन्वयक डॉ अविनाश पोळ व अन्य सिनेकलाकार यांनी उपग्रहाद्वारे गावकऱ्यांशी संवाद साधला. डॉ अविनाश पोळ, अभिनेते भारत गणेशपुरे, सुनिल बर्वे, किरण राव, जितेंद्र जोशी, अमीर खान, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावकऱ्यांची संवाद साधून त्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले.
गावकऱ्यांशी संवाद
गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांनी या वॉटर कप स्पर्धेत उत्फुर्तेपणे सहभाग घ्यावा. स्पर्धेदरम्यान गावकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात सिनेअभिनेता अमीर खान यांनी कारंजा तालुक्यातील लोणी अरब येथील गावकऱ्यांशी ५ एप्रिल रोजी संध्याकाळच्यावेळी संवाद साधला व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. अमीरजी बोलतांना म्हणाले की, गाव जर स्पर्धेदरम्यान एकत्र आलं तर गावात नक्कीच पाणी थांबेल व गाव पाणीदार होईल असा विश्वास अमीर खान यांनी गावकऱ्यांना दिला.