विविध मागण्यांसंदर्भात ग्रामरोजगार सेवकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:25 PM2018-12-24T16:25:34+5:302018-12-24T16:26:22+5:30
वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी ‘एल्गार’ पुकारला असून २४ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी ‘एल्गार’ पुकारला असून २४ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.
राजकीय व्देषापोटी कामावरून कमी करण्यात आलेल्या ग्रामरोजगार सेवकास पुन्हा कामावर घ्यावे, ग्रामरोजगार सेवकांना ग्रामसभा तसेच ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून अलिप्त ठेवावे, पुर्णवेळ कर्मचाºयाचा दर्जा द्यावा, मासिक मानधन लागू करण्यात यावे, मिळत असलेले मानधन त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करावे, ग्रामरोजगार सेवकाला सहायक ग्रामसेवकाचा दर्जा बहाल करावा, त्यांच्या कामात कलम ३५३ लागू करण्याचा अधिकार द्यावा, ग्रामसेवक पदाची परीक्षा देण्याचा अधिकार असावा, विमा, दैनंदिन प्रवासभत्ता हा २ आॅक्टोबर २०१३ पासून लागू करावा व त्यात शासनाच्या दराप्रमाणे वाढ करण्यात यावी, आदी मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासन तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामरोजगार सेवक संघटनेने यापूर्वी शासन, प्रशासन दरबारी पाठपुरावा केला. मात्र, याकडे लक्ष देण्यात आले नाही. न्यायोचित मागण्या निकाली निघण्याच्या दृष्टिकोनातून सोमवार, २४ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात जिल्हाभरात ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.