जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामसेवक सरसावले
By admin | Published: April 29, 2017 07:12 PM2017-04-29T19:12:52+5:302017-04-29T19:12:52+5:30
तालुका दुष्काळमुक्त करण्याचा ध्यास गावकरी आणि पदाधिकाºयांना लागला असताना आता ग्रामसेवक संघटनाही जलसंधारणाच्या कामांसाठी सरसावली आहे.
कारंजा लाड : लोकसहभागातून तालुका दुष्काळमुक्त करण्याचा ध्यास गावकरी आणि पदाधिकाऱ्यांना लागला असताना आता ग्रामसेवक संघटनाही जलसंधारणाच्या कामांसाठी सरसावली आहे. जयपूर येथे २९ एप्रिल रोजी कारंजा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांसह ग्रामसेवक संघटनेने श्रमदानातून तीन एलबीएसची कामे गावकऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केली.
फांउडेशनकडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेदरम्यान गावकरी मोठया उत्साहाने सकाळी व रात्री श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हा गावक-यांचा उत्साह वाढविण्यासाठी कारंजा पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी व ग्रामसवेक मंडळीनी २९ एप्रिल रोजी जयपुर गावक-यांच्या मदतीने गावातील नाल्यावर पाणी व माती साठविण्याची क्षमता असलेल्याा एल.बी.एस.ची अर्थात दगडी बांधाची निर्मिती श्रमदानातून करण्यात आली.
गावातील चिमुकलेही लावताहेत वडिलधाऱ्या मंडळीला हातभार
पाणी फांउडेशन कडून सत्यमेव जयते वॉटर स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेदरम्यान गावकरी मोठया उत्साहाने सकाळी व रात्री श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करीत असताना बालकांनीही यात सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली आहे. जयपूर येथे २९ एप्रिल रोजी ग्रामसेवक संघटना आणि गावकरी एलबीएसच्या कामाला भिडले असताना गावातील लहान लहान बालकांंनीही आपली चमू तयार करून वानरसेनेप्रमाणे एलबीएसच्या कामांसाठी श्रमदान करुन मोठा हातभार लावला. बालगोपालांनी उन्हातही जलसंधारणाच्या कामात गावकऱ्यांना सहकार्य केले. बालगोपाल जलसंधारणाच्या कामात सहकार्य करीत असल्याचे पाहून वडिलधारी मंडळी भारावली.