ग्रामसेवक संघटनेचा कामावर बहिष्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:16 PM2017-10-03T20:16:01+5:302017-10-03T20:17:12+5:30

मालेगाव (वाशिम): दिवाळीचा सण तोंडावर आला असताना ग्रामसेवकांचे वेतन रोकण्यात आल्याने तालुक्यातील ग्रामसेवकांनी ३ आॅक्टोबर रोजी पंचायत समिती गाठून नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांना जाब विचारून वेतन होईपर्यंत कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. 

Gramsevak organization boycott at work! | ग्रामसेवक संघटनेचा कामावर बहिष्कार!

ग्रामसेवक संघटनेचा कामावर बहिष्कार!

Next
ठळक मुद्देदिवाळी सणाच्या तोंडावरच ग्रामसेवकांचे वेतन रोखण्यात आले आहेग्रामसेवकांनी विचारला गटविकास अधिका-यांना जाब

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): दिवाळीचा सण तोंडावर आला असताना ग्रामसेवकांचे वेतन रोकण्यात आल्याने तालुक्यातील ग्रामसेवकांनी ३ आॅक्टोबर रोजी पंचायत समिती गाठून नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांना जाब विचारून वेतन होईपर्यंत कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. 
केवळ ग्रामसेवकांचे वेतन न करता मालेगाव पंचायत समितीचे इतर सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांचे वेतन ३ आॅक्टोबरला करण्यात आले. ही बाब लक्षात येताच संबंधित सर्व ग्रामसेवकांनी गटविकास अधिकाºयांना संर्क साधला. तसेच वेतन प्रक्रियेची जबाबदारी असणाºया लिपीकालाही जाब विचारण्यात आला. दरम्यान, जोपर्यंत वेतन मिळत नाही, तोपर्यंत कामावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी ग्रामसेवकांनी दिला. 

Web Title: Gramsevak organization boycott at work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.