दिव्यांग विद्यार्थ्याकरिता शाळा स्तरावर अनुदान जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 04:04 PM2020-04-28T16:04:36+5:302020-04-28T16:04:53+5:30

सदर अनुदानाचा लाभ ५१ शाळांमधील १०० विद्यार्थ्यांना मिळत आहे.

Grant collection at school level for disabled students | दिव्यांग विद्यार्थ्याकरिता शाळा स्तरावर अनुदान जमा

दिव्यांग विद्यार्थ्याकरिता शाळा स्तरावर अनुदान जमा

Next

रिसोड : रिसोड तालुक्यातील वर्ग एक ते बारावीमधील दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता तीन लाख ३१ हजार रुपये अनुदान शाळास्तरावर २२ एप्रिल रोजी जमा करण्यात आले असून, सदर अनुदानाचा लाभ ५१ शाळांमधील १०० विद्यार्थ्यांना मिळत आहे.
विशेष गरजा असणाºया दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता अनुदान दिले जाते. वर्ग १ ते ९ करिता मदतनीस भत्ता ३९०० याप्रमाणे तसेच प्रवास भक्ता ६ हजार रुपये, प्रोत्साहन  भक्ता २ हजार रुपये तसेच इयत्ता नववी ते बारावी करिता मदतनीस भत्ता ९००, प्रवासभत्ता ५००, प्रोत्साहन भत्ता ३०० रुपये प्रमाणे शाळा स्तरावर जमा करण्यात आला. सदर अनुदान पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याकरिता पात्र विद्यार्थ्यांची यादी संबंधित शाळांना देण्यात आली आहे. सदर अनुदान हे शैक्षणिक सत्र २०१९-२० या वर्षात विशेष गरजा असणाºया दिव्यांग विद्यार्थ्यांना वितरित केले जात आहे. 


शैक्षणिक सत्र २०१९-२० करिता विशेष गरजा असणाºया दिव्यांग विद्यार्थ्याकरिता तालुकास्तरावर शाळेच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले. पात्र विद्यार्थ्यांची यादी सुद्धा संबंधित शाळांना देण्यात आली. त्यांनी आपल्या नियोजनानुसार अनुदान वितरित करण्याची कार्यवाही करावी.
-गजानन बाजड
गटशिक्षणाघिकारी, पंचायत समिती रिसोड

Web Title: Grant collection at school level for disabled students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.